Home | National | Other State | Sirsa News, Suicide Mystery, Love After Divorce, Now Suicide

ऑर्केस्ट्रा आर्टिस्टने केली आत्महत्या, भिंतीवर लिहिली सुसाइड नोट...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 10:04 AM IST

सिरसामध्ये किरायाने राहत होती मृत महिला,दोन वर्षांपूर्वी झाला होता घटस्फोट.

  • Sirsa News, Suicide Mystery, Love After Divorce, Now Suicide

    सिरसा(हरियाणा)- भिंतीवर मार्करने सुसाइड नोट लिहून दिल्लीत राहणाऱ्या एका ऑर्केस्ट्रा आर्टिस्टने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी तिची मैत्रिण तिच्या घरी आल्यावर घटनेची माहिती मिळाली. सुसाइड नोटमध्ये महिलेने स्वत:लाच जबाबदार ठरवले आहे. तिचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. पोलिसांना संशय आहे की, प्रेम संबंधातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

    - पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीच्या नांगलोईमध्ये राहणारी शरणजीत उर्फ सिम्मी(30) ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होती. तिचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तिने सिरसाणध्ये नवीन धान्य मंडीजवळ किरायाने घर घेतले होते.

    - बुधवारी सिरसामध्ये एक ऑर्केस्ट्रा प्रोग्राम होता, त्यासाठी ती सिरसाला आली होती. सकाळी शरणजीत उठली नाही, तर तिच्या मैत्रिणीने दार ठोठावले. त्यानंतर इतर आर्टिस्टनी मिळून दार तोडले आणि आत पाहिले की, शरणजीत लटकलेल्या अवस्थेत होती.

    - भिंतीवर शरणजीतने एक सुसाइड नोट लिहिली होती, ज्यात तिने स्वत:लाच मृत्यूस जबाबदार ठरवले आहे.

Trending