Home | National | Other State | sister and brother beat one policeman, video goes viral

भावाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी बहिण बनली गुंड, भर रस्त्यात पोलिसला मारले, व्हिडिओ झाला व्हायरल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 04:07 AM IST

युवकाला अटक करण्यासाठी गेले होते पोलिस

  • sister and brother beat one policeman, video goes viral


    फतेहाबाद(हरियाणा)- आरोपी युवकाला पकडण्यासाठी गेलेले होते पोलिस, भट्टू रोडवर आरोपी युवक आणि त्याच्या बहिणीने हल्ला चढवला. दोघांनी पोलिसाला बेदम मारून त्याचा गणवेश फाडला. त्यानंतर दोघे तेथून पळून गेले.

    - जखमी हेड काँस्टेबल राजेश कुमार यांनी सांगितले की, ते सुमित उर्फ ढांगीला पकड्यासाठी गेले होते. त्यांना आरोपी एका हेअर कटींग सलूनवर दिसला. ते त्याला पकडण्यासाठी गेले असता तिथे आरोपीची बहिण आली आणि त्या दोघांनी पोलिसावरच हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

    - सुमितवर एका युवकसोबत मारहाण आणि अपहरणाचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे.

Trending