आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या भावाला शोधत टॉयलेटपर्यंत पोहोचली बहीण, अचानक ऐकू आली भावाच्या मोबाईलची रिंगटोन, आत पाहिले तर..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ वेल्स - ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी एका शालेय विद्यार्थ्याने त्यांच्याच शाळेच्या टॉयलेटमध्ये फाशी घेत आत्महत्या केली होती. बेपत्ता झाल्यानंतर बहीण त्याला शोधत होती. टॉयलेटजवळून गेली तेव्हा तिला भावाच्या मोबाईलची रिंगटोन ऐकू आली. ती ऐकताच तिला भाऊ कुठे आहे हे कळले. त्यानंतर त्याबाबत सर्वांना समजले. 


वर्गात जात नव्हता ब्रेडली 
- ही कथा आहे वेल्सच्या लानेली शहरामध्ये राहणाऱ्या बॅरन जॉन (53) यांचा मुलगा ब्रेडली जॉन (14) याची. त्याने 13 सप्टेंबरला शाळेच्या बाथरूममध्ये फाशी घेत आत्महत्या केली होती. 
- ब्रेडली लानेली सेंट जॉन लॉयड रोमन कॅथलिक स्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या वडिलांच्या मते, शाळेत गुंड मुले त्याला खूप त्रास द्यायचे. त्यामुळे तो घाबरायचा आणि अनेकदा बाथरूममध्ये जाऊन लपायचा. 
- घटनेच्या दिवशी ब्रेडली शाळेत एका वर्गात अबसेंट होता. दीड तासानंतर याबाब त्याची लहान बहीण डॅनियल (11) ला समजले तेव्हा ती त्याला शोधू लागते. सर्वात आधी ती टॉयलेटजवळ जाते. 


भावाची रिंगटोन ओळखली.. 
- डॅनियलला माहिती होते की, ब्रेडलीला मुलांनी त्रास दिला की, तो बाथरूममध्ये जाऊन लपत असतो. त्यामुळे ती थेट तेथे गेली. 
- यादरम्यान अनेक जण ब्रेडलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वारंवार मोबाईलची रिंगटोन वाजत होती. ती ऐकूण ब्रेडलीला खात्री झाली की तिचा भाऊ आतच आहे. 
- डॅनियलने भावाला अनेकदा आवाज दिले. पण काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर तिने शाळेतील लोकांना सांगून दार तोडले पण ते लोक आत गेले नाही. पॅरामेडिक्स स्टाफने दीड तास ब्रेडलीला वाचवायचा प्रयत्न केला पण ते त्याला वाचवू शकले नाही. 


आजाराशी सुरू होता संघर्ष 
- दार उघडताच ब्रेडलीने सर्वात आधी आत जाऊन बावाला पाहिले होते. आतमधले दृश्य पाहून तिला एवढा भयंकर धक्का बसला की ती ते आजवर विसरू शकलेली नाही. 
- ब्रेडलीच्या वडिलांच्या मते, त्यांचा मुलगा सहा वर्षाचा असल्यापासून ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसऑर्डर) नावाच्या आजाराचा सामना करत होता. त्यामुळे तो पूर्णपणे विखुरला गेला होता. शाळेने योग्य वेळीच कारवाई केली असती तर मुलगा वाचला असता असे ते म्हणाले. 
- सध्या मुलीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ब्रेडलीचे वडील म्हणाले. 

(जगभरात अशा काही घटना घडत असतात, ज्याबद्दल आपल्यालाही माहिती असायला हवे. यामुळे ही स्टोरी याठिकाणी देत आहोत.)

 

बातम्या आणखी आहेत...