आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नणंद-भावजयीचा एकाच वेळी मृत्यू; अचानक बंद झाली नजर; एक-एक करून दोघींनीही तोडला दम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौसा (राजस्थान) -  एक विवाहिता महिला आणि तिच्या भावजयीचा सर्पदंशामुळे माहेरातच मृत्यू झाला. हरिसिंह पटेल म्हणाले, त्यांचा मुलगा कुंदन गुर्जरची पत्नी नीतू माहेरी राजपुरा येथे गेली होती. येथे तिला व तिची भावजयी भाग्यश्रीला सापाने दंश केला. घटनास्थळी 2 वर्षांची चिमुरडी होती, तिचे रडणे ऐकून भाग्यश्रीच्या सासूने तिकडे धाव घेतल्यावर घटनेचा खुलासा झाला. कुटुंबीयांनी सांगितले, दोघींना डोळ्यांनी काहीही दिसत नव्हते. 

 

एक-एक करून दोघींनी तोडला दम
साप चावल्यानंतर कुटुंबीय दोघींनाही गावातीलच एका देवस्थानावर घेऊन गेले. जादू-टोणा केल्यानंतर काही वेळाने दोघींची प्रकृती थोडी स्थिर झाली. परंतु एका तासानंतर दोघीही बेशुद्ध झाल्या. त्यांना एका आणखी देवतेच्या स्थानावर नेण्यात आले. तेथे परिस्थिती जास्त बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच दोघींनीही एकामागोमाग दम तोडला. 

कुंदनचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नुकतेच तिचे सासरे हरिसिंह यांनी तिला माहेरात नेऊन सोडले होते. मृत महिलेचे वडील बन्नासिंह दिल्लीत फॅक्टरीत नोकरी करतात. तिची आई सरोज देवीसुद्धा त्यांच्याचकडे राहते.

 

बातम्या आणखी आहेत...