आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावशीच्या नवऱ्याबरोबर होते अफेयर, प्रियकराच्या मदतीने अशी केली सख्ख्याभावाची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनहत - संतोष नावाच्या तरुणाची त्याच्या सख्ख्या बहीण आणि मावशाने डोक्यात सब्बल घालून हत्या केली आहे. संतोषची बहीण आणि मावसा यांचे अफेयर सुरू होते. त्यांच्यामध्ये अवैध संबंधही होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर संतोषने त्याच्या मावशाला मारहाण केली होती. त्यानंतर संतोषच्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली. त्याच्या डोक्यावर सब्बलचे अनेक वार केल्याने तो जागीच ठार झाला. 


माहिती मिळाल्यानंतर संतोषचे वडील हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण चौकशीदरम्यान पोलिसांना या कटाचा सुगावा लागला. दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी गुन्हा कबूल केला. 


बहिणीने हात पाय पकडून ठेवले 
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, संतोषच्या बहिणीचे विदुर याच्याशी अफेयर होते. याबाबत संतोषला समजले तेव्हा त्याने विदुरला मारहाण केली. त्यानंतर संतोषची बहीण आणि विदुरचा त्याच्यावर राग होता. त्यामुळे रात्री एकटा झोपलेला पाहून या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. संतोषच्या बहिणीने प्रियकर विदुरला फोन करून बोलावून घेतले. विदुरने घरातील लोखंडी सब्बलने संतोषच्या डोक्यावर वार केले. त्यावेळी बहिणीने संतोषचे पाय धरून ठेवले होते. हत्येनंतर आरोपी लगेच फरार झाला.

बातम्या आणखी आहेत...