आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sister's Sister Threaten Rape Case, So Turned Transgender By Devendra With Devika

बहिणीची नणंद रेपचा आरोप लावणार असल्याची होती भीती; शस्त्रक्रिया करून लिंगच बदलले, अन् देवेंद्र बनला देविका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- लग्नानंतर बहिणीचा संसार उद्धवस्त होऊ नये, यामुळे भावाने ऑपरेशन करून आपले लिंग परिवर्तन केले और फिमेल ट्रांसजेंडर बनला. देवेंद्रचा देविका बनण्याची गोष्ट खूप मार्मिक आहे. देवेंद्रच्या बहिणीच्या नंदेने धमकी दिली होती, की, जर त्याच्या बहिणीने सासरच्या लोकांविरूद्ध पोलिसांकडे आत्याचाराची तक्रार केली, तर ती त्याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. ही धमकी तिने अनेकवेळा दिली, त्यामुळे घाबरलेल्या देवेंद्रने आपले ऑपरेशन करून ट्रांसजेंडर बनला.

 


या घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा हे प्रकरण विधी सेवा मंडळात पोहोचले. येथे बहिणीला कायदेशीर सुरक्षा देण्यात आली, त्यानंतर तिचा कायदेशीर घटस्फोट झाला. लिंग परिवर्तन करण्यापूर्वी देवेंद्र बिझनेस करत होता. देवेंद्रने सांगितल्यानुसार, त्याच्या बहिणीचे लग्न 20 मे 2016 ला झाले होते. तेव्हा तो एका सामान्य पुरुषाप्रमाणेच होता. बहिणीच्या लग्नानंतर तिला हूंड्यासाठी त्रास देणे सुरू झाले. बहिणीचा संसार वाचवण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. 

 


आत्याचाराची तक्रार करण्यास भ्यायला होता
देवेंद्रने पोलिसांत तक्रार केली, तर बहिणीच्या नंदेने आणि सासूने मिळून एक कट रचला. नंदेने त्याच्याविरूद्ध बलात्काराची तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये त्याने ऑपरेशन करून आपले लिंग बदलले. देवेंद्र इतका संवेदनशील होता की, त्याने आपले घर-दार सोडून किन्नरांसोबत राहणे सुरू केले. त्याने सांगितले की, आता त्याने आपल्या एकुलत्या एक बहिणीची दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न लावून दिले. ते तीन भाऊ आणि एक बहिण आहेत. आता देवेंद्र देविका बनून ट्रांसजेंडरच्या अधिकारांसाठी लढत आहे.