• Home
  • National
  • SIT arrested bjp leader Swami Chinmayananda in Shahjahanpur rape case

शाहजहांपूर केस / भाजप नेता स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कारप्रकरणी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विद्यार्थिनीने व्हिडिओ पोस्ट करून केले होते आरोप, एसआयटीने शुक्रवारी सकाळी केली कारवाई 
 

Sep 20,2019 02:21:52 PM IST

शाहजहांपूर - उत्तर प्रदेशाच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात एसआयटीने माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजप नेता चिन्मयानंदला अटक केली. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. एसआईटीने चिन्मयानंद यांना त्यांच्या आश्रमातून ताब्यात घेतले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आश्रमाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिन्मयानंद यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून एसआयटी प्रकरणाची चौकशी करत आहे. एसआयटी प्रभारी आयजी नवीन अरोरा यांनी सांगतिले की, विद्यार्थिनीने दोन दिवसांपूर्वी एक मोबाईल आणि एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्यांची तपासणी करण्यासाठी ते फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थिनीने या पेन ड्राईव्ह मध्ये पुराव म्हणून 43 व्हिडिओ क्लिप्स असल्याचे सांगतिले.


आरोपीला अटक न केल्याबद्दल पीडिताने उपस्थित केले सवाल
विद्यार्थिनी आपले वडील आणि भावासोबत बुधवारी उच्च न्यायालयात गेली होती. यावेळी पीडितेने संपूर्ण प्रकरणात एसआयटीवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला होता. ती म्हणाली, 'की आम्हाचा तपासावर विश्वास नाही. कारण सोमवारी न्यायाधीशांसमोर निवेदन नोंदवूनही एसआईटी काहीच सांगत नाहीये. चिन्मयानंद यांना अटक झाली नाही तर मी आत्मदहन करेन. तुरुंगात जाण्याच्या भीतीने चिन्मयानंद आजारी पडल्याचे सोंग करत आहेत.'


विद्यार्थिनीने 24 ऑगस्ट रोजी व्हिडिओ पोस्ट करून आरोप केले होते
स्वामी सुखदेवानंद विधी महाविद्यालयात एलएलएम करणाऱ्या विद्यार्थिनीने 24 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने सांगितले होते की, एक संन्यासाने अनेक मुलींचे आयुष्य बर्बाद केले आहे. तसेच पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला संन्यासाकडून धोका आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी चिन्मयानंद विरोधात लैंगिक शोषणाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले.

माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे - चिन्मयानंद
याअगोदर स्वामी चिन्मयानंद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गठित केलेली एसआयटी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करीत आहे आणि त्याबद्दल त्यांना विश्वास आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. एसआईटी तपासानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.

X