आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदिगड - पंजाबमध्ये गुरुग्रंथसाहिबची अप्रतिष्ठा आणि गोळीबार प्रकरणाची चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी अभिनेता अक्षयकुमारची दीड तास चौकशी केली. अक्षयकुमारने डेरा सच्चा सौदाचा तत्कालीन प्रमुख गुरमीत राम रहीम याचा ‘मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट पंजाबमध्ये चालवण्यासाठी अकाली दलाशी १०० कोटींचा करार केला होता, असा आरोप अक्षयकुमारवर आहे.
त्याला उत्तर देताना, ‘हे आरोप चित्रपटाच्या कथेप्रमाणे कपोलकल्पित आहेत,’ असे अक्षयने म्हटले. एसआयटीला त्याने सांगितले की, ‘मी आजपर्यंत गुरमीत राम रहीमला कधीही भेटलेलो नाही. पण त्याने एक चित्रपट तयार केला होता, एवढे मला निश्चित माहीत आहे.
मी सुखबीर बादल यांना ओळखतो. पंजाबमध्ये एका कबड्डी स्पर्धेच्या वेळी माझी आणि त्यांची भेट झाली होती.’ माझी, सुखबीर बादल यांची आणि गुरमीत राम रहीम यांची मुंबईत कधीही भेट झाली नव्हती, अशी स्पष्टोक्ती अक्षयकुमारने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.