आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉसमॉस घोटाळा तपासासाठी एसअायटी, बँकेच्या सायबर सुरक्षा यंत्रणेची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कॉसमॉस बँकेतील सायबर घोटाळ्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हॅकर्सनी बँकेचे सर्व्हर हॅक करून दोन दिवसांत सुमारे ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारला होता.


देशातील व्यवहारांवर लक्ष केंद्रित करून तपास केला जाणार आहे. यानंतर परदेशांतील व्यवहारांची चौकशी होईल, असे पोलिस उपमहासंचालक (सायबर व आर्थिक गुन्हे शाखा) ज्योतिप्रिया सिंग यांनी सांगितले. कोल्हापूर येथील एका एटीएममधून काही अनधिकृत व्यवहार झाले असल्याचे कॉसमॉस सहकारी बँकेने पोलिसांना कळवले होते. त्यामुळे बँकेने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या ऑडिटची माहिती पोलिस घेत आहेत. या सर्व यंत्रणा सुरक्षित होत्या की नाही, याचीही चौकशी केली जात आहे. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर कॅनडामधून पहिला सायबर हल्ला झाला होता.

बातम्या आणखी आहेत...