आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबाड कष्ट करुन शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा मुलांची भारतीय सैन्य दलात एकाच वेळी निवड

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दोन भावंडांसह सापटणे(भोसे)गावातील चौघांचा तर माढ्यातील दोघांचा समावेश

संदिप शिंदे

माढा- भारतीय लष्करात जाण्याची अनेकांची इच्छा असते. दरवर्षी अनेकजण भारतीय सैन्यात भर्ती होतात. पण, एकाचवेळी सहा शेतकऱ्यांच्या मुलांची लष्करात निवड झाल्याची कौतुकास्पद गोष्ट सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील सापटणे(भोसे)गावातील चौघांचा तर माढा या गावातील दोघांचा समावेश आहे.


सापटणे(भोसे) गावातील तोहिद शमिन काझी आणि तोफिक शमिन काझी या भावंडासह रोहित भैरु गायकवाड आणि निकेतन दशरथ पाटील यांची तर माढ्यातील जीवन महादेव गोसावी आणि अक्षय औदुंबर कदम यांची भारतीय लैष्करात निवड झाली आहे. यातील चौघे 
माढ्यातील रयत महाविद्यालयाचे तर दोघे के.एन.भिसे महाविद्यालयाच्याचे विद्यार्थी आहेत. 


सामान्य कुटुंबातील या सहा जणांना प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन भारतीय सैन्य दलात जाण्याचे ध्येय गाठल्याने नव सैनिकांवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या सैन्य दलाच्या परिक्षे नुकताच जाहिर झाला आहे. 38 महाराष्ट्र बटालियनचे कंमाडींगग ऑफिसर मनदिपसिंग व एन.सी.सी विभाग प्रमुख प्रा.नवनाथ लवटे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश ढेरे यांनीदेखील आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सन्मान केला. 

मुलांनी देशाची सेवा करुन गावाचे नाव रोषण करावे


दोन्ही मुले सैन्य दलात भरती झाली यापेक्षा आमच्या जीवनात सर्वोच्चा आनंदाचा दुसरा कोणताच क्षण नाही. आमच्या कष्टाचे मुलांनी चीज केले. सैन्य दलात जाऊन त्यांनी सीमेवर देशाची सेवा करुन गावाचे नाव रोषण करावे, हीच आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया तोहिद व तौफिक यांचे वडील शमिन व आई जुलेखा यांनी दिली.