आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडण सोडवायला गेलेल्यांनाच मारहाण; हॉटेलवरही धिंगाणा, ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात घडल्या घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण सहा प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले

औरंगाबाद- सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना काही ठिकाणी मात्र दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ३१ डिसेंबर रोजी रात्रीपासून ते १ जानेवारीच्या पहाटेदरम्यान या घटना घडल्या. काही ठिकाणी केवळ दुचाकीचा कट मारण्यावरून फायटरने मारहाण केली तर दोन घटनांमध्ये हॉटेलचालकाने जेवण देण्यास नकार दिला म्हणून व्यवस्थापकाला मारहाण करून गंभीर जखमी केले गेले. एकूण सहा प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.> फायटरने मारहाण


जनार्दन शामराव असवार (४४, रा. चिकलठाणा) हे मित्रासह ३१ डिसेंबर रोजी रात्री पाऊणेबारा वाजता मुकुंदवाडीच्या सर्व्हिस रोडने ठाकरे नगरकडे जात असताना वाइन शॉप समोर चार जणांनी अॅक्टिव्हा (एमएच २० ईए ३४६७) रस्त्याच्या मधोमध उभी केली. असवार यांनी त्यांच्या हॉर्न वाजवून बाजूला व्हा, असे सांगितले म्हणून चाैघांनी त्यांना व त्यांच्या मित्राला धक्काबुक्की केली. एकाने थेट फायटरने असवार यांच्या चेहऱ्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

> हॉटेलमध्ये तोडफोड


दौलताबाद परिसरातील हॉटेल दयासागरमधील कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. आरोपी विजय सोनवणे, प्रदीप सोनवणे, बबन कांबळे व प्रकाश जाधव यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत तक्रारदार व त्यांच्या भावांना तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. त्यानंतर हॉटेल बाहेर उभ्या वाहनांची तोडफोड केली. या सर्व घटनादरम्यान चेतक घोडा परिसरात रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांच्या एका पथकाने चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्या परिसरातील सर्वच टवाळखोरांनी घरचा रस्ता धरला.

> दंडुक्याने डोक्यात वार


संभाजी कॉलनीच्या ई सेक्टरमध्ये रंजित बिभीषण काकडे (२३) हा पहाटे पावणेतीन वाजता अाविष्कार कॉलनीच्या मैदानावर उभा होता. या वेळी आरोपी सचिन घोरपडे, डॅनियल घोरपडे यांनी त्याला शिवीगाळ करून वाद घातला. काही वेळाने आरोपींनी त्याच्या घरासमोर जाऊन रंजितच्या डोक्यात लाकडी दांडुका घातला. यात रंजितच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, दहा टाके पडले अाहेत. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

> लोखंडी रॉडने वार


जेवण देण्यास नकार दिला म्हणून एन-६ मध्ये हॉटेल चालक प्रदीप प्रवीण सोनवणे (३१, रा. एन-६) याला शुभम लाहौट, दीपक शिंदे, सूरज बोखरे व त्यांच्या एका मित्राने लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. ३१ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. यात प्रदीपचा भाऊ शशिकांत यालाही आरोपींनी मारहाण केली. या दरम्यान त्यांच्या हाॅटेलमधली गल्ल्यातील रोख रक्कमही लंपास झाल्याचे त्यांनी सिडको पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

> डोक्यात घातला दगड


१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता सेव्हन हिल ते गजानन मंदिर रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडवणे एकाला चांगलेच महागात पडले. अभिनय भाऊसाहेब जंजाळ हा मित्रांसह घरी जात होता. पंपाजवळ दोन गटांमध्ये हाणामारी सुरू असताना त्याने रिक्षातून उतरून सोडवण्याचा प्रयत्न करताच अभिनयच्याच डोक्यात दगडाने वार झाले. मित्रांनी हस्तक्षेप करताच त्यांनाही मारहाण करण्यात अाली. याप्रकरणी बाळकृष्ण सूर्यवंशी व एका अाराेपीवर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

बातम्या आणखी आहेत...