अकोला / अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच सहा शेतकऱ्यांनी प्राशन केले कीटकनाशक; भूसंपादनाचा वाढीव माेबदला न मिळाल्याने ‌उचलले पाऊल

अकोला येथील प्रकार, सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर

दिव्य मराठी

Aug 06,2019 08:38:00 AM IST

अकाेला - राष्ट्रीय महामार्ग चाैपदरीकरणासाठी संपादित जमिनीचा वाढीव माेबदला न मिळल्याने सोमवारी बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी अपर िजल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच कीटकनाशक प्राशन केले. या शेतकऱ्यांना सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बुधवारी अकाेल्यात येणार असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे प्रशासन हादरले आहे.


सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी बाळापूर तालुक्यासह इतरही ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र या भूसंपादनाचा अल्प माेबादला मिळाला. माेबदला देताना भेदभाव करण्यात येत आहे, असा आराेप शेतकऱ्यांनी केला.


या शेतकऱ्यांत साजिद इकबाल शेख महेमूद (३०), माेहम्मद अफजल गुलाम नवी रंगारी (३०), आशिष िहवरकर (३२), मुरलीधर प्रल्हादराव राऊत (४२), अर्चना भारत टकले (३५), नीळकंठराव देशमुख यांचा समावेश आहे.

अधिकारी म्हणाले माझा काय इलाज ?
माेबदल्याप्रकरणी कासारखेड, भुखंडखेडसह आणखी काही गावांबाबत अपर िजल्हाधिकारी कक्षात सुनावणी हाेती. काहींचा आदेश मंजूर झाला. मात्र वाढीव माेबदला िमळत नसेल तर आत्महत्येची वेळ येईल, असे आम्ही सांगितले. अधिकाऱ्यांनी यावर ‘माझा काय इलाज’, असे म्हटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

X