आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six Highly Qualified Terrorists Including A Phd Scholar Arrested In Kashmir Car Blast

J&K: हायवे ब्लास्ट प्रकरणात 6 दहशतवाद्यांना अटक, त्यातील 3 दहशतवादी उच्च शिक्षित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या महिन्यातच झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणी 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या 6 दहशतवाद्यांपैकी तीन जण उच्चशिक्षित आहे. त्यातही एक जण चक्क पीएचडी स्कॉलर आहे. बनिहाल येथून सीआरपीएफचा ताफा जात असताना हा स्फोट झाला होता. त्याच स्फोटाचा पोलिसांनी छळा लावला. या स्फोटाचा आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा काहीच संबंध नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक एमके सिन्हा यांनी सांगितले, की 31 मार्च रोजी बनिहाल येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा हात होता.


> पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या बसला लक्ष्य करून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, यात सुद्धा सीआरपीएफच्या ताफ्यालाच लक्ष्य करण्यात आले होते. परंतु, पुलवामा हल्ल्याचा आणि बनिहाल हल्ल्याचा काहीच संबंध नाही. त्यातही बनिहाल स्फोटाची तीव्रता कमी होती. यासाठी ह्युंडई कार वापरण्यात आली होती. स्फोटानंतर अनेक वाहनांना आग लागली. ही घटना सुरक्षा यंत्रणेतील कसूर मानली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. यामध्ये 6 मुख्य आरोपींना अटकही करण्यात आली.
> पाकिस्तानी दहशतवादी मुन्ना बिहारीच्या नेतृत्वात जैश आणि हिज्बुलने संयुक्तरित्या या हल्ल्याचा कट रचला होता. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक पीएचडी स्कॉलर हिलाल अहमद मंटू जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेचा सक्रीय सदस्य आहे. भटिंडा येथील पंजाब केंद्रीय विद्यापीठातून अटक करण्यात आली. इतर पाच दहशतवाद्यांमध्ये वसीम उर्फ डॉक्टर, उमर शफी, शोपियाँतील आकिब शाह, पुलवामाचा शाहिद वानी आणि औवेस अमीन यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...