आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six Including A Foreign Terrorist Killed In An Operation By Kashmir Security Forces

जम्मू-कश्मीरात चकमक: 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, त्राल येथे मोठ्या प्रमाणाथ शस्त्रसाठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे शनिवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली. यामध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक परदेशी दहशतवादी अंसार गजवतुल हिंद याचा देखील समावेश आहे. तो जाकिर मूसा टोळीचा सदस्य होता असे सांगितले जात आहे. तर उर्वरीत दहशतवादी काश्मीरचेच आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

 

SP Pani, IG Kashmir on Pulwama encounter: 6 terrorists were killed in the operation, there was no collateral damage. Identities and affiliation of terrorists being ascertained. We thank civilians for cooperating with us, it was a clean operation. pic.twitter.com/luSSREueEr

— ANI (@ANI) December 22, 2018

 

त्राल येथील अरमपोरा गावात काही दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती लष्कर आणि पोलिसांना मिळाली होती. त्यानंतरच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसह सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन केले. शोध मोहिम सुरू असताना अचानक जवानांवर फायरिंग करण्यात आली. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर जोरदार चकमक उडाली आणि 6 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. दरम्यान एनकाउंटरच्या विरोधात निदर्शने सुरू असल्याने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...