आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कऱ्हे घाट, चास परिसरात दोन अपघातांत सहा ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाट व नगर तालुक्यातील चासजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात मालवाहू वाहनांवर मागच्या बाजूने भरधाव कार धडकून झाले. 

नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात हॉटेल संजय पॅलेससमोर बुधवारी रात्री उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली. या अपघातात सुपे येथील उद्योजक संदीप किसन पवार (४४), भरत भाऊसाहेब ननवरे (२३, दोघे सुपे, ता. पारनेर), श्रीकांत गायकवाड (२०, चिंचोली, ता. पारनेर) हे तिघे जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला.
 

दुुसरा अपघात कऱ्हे घाटाजवळ... 
संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटाजवळ झालेल्या कार आणि मालट्रकच्या अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय २९, कऱ्हे, संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड (वय २८, दरेवाडी, संगमनेर, हल्ली सिन्नर) आणि अजय श्रीधर पेंदाम (वय २७, नागबीड, चंद्रपूर) हे तिघे ठार झाले.