आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूमध्ये घुसले लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी, राज्यात अतिदक्षतेचा इशारा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोईम्बतूर : लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी सागरी मार्गाने श्रीलंकेतून भारतातील तामिळनाडूमध्ये घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अलर्ट शहराचे पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना पाठवण्यात आला. 

या अलर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम असून त्यांनी हिंदूंचा पेहराव केला आहे, ते राज्यभरात दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे.

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या संरक्षण संस्था, धार्मिक आणि पर्यटन स्थळ तसेच विदेशी दूतावास दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील आणि किनारपट्टी भागातील यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.