Home | International | Other Country | six missing after two US military planes collided while refuelling in the sky

हवेत इंधन भरताना मोठा विमान अपघात; अमेरिकेचे दोन लढाऊ विमान धडकले, 6 जण बेपत्ता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 11:00 AM IST

जपानच्या आकाशात अमेरिकन लष्कराचे लढाऊ विमान F-18 हे C-130 टँकरने इंधन भरत होते.

  • six missing after two US military planes collided while refuelling in the sky

    टोक्यो - जपानमध्ये गुरुवारी आकाशात इंधन भरत असताना दोन लढाऊ विमान एकमेकांना धडकले. जपानच्या आकाशात अमेरिकन लष्कराचे लढाऊ विमान F-18 हे C-130 टँकरने इंधन भरत होते. त्याचवेळी दोन्ही विमान एकमेकांवर आदळले. या विमानात प्रवास करणारे अमेरिकन नेव्हीचे 6 सैनिक बेपत्ता झाले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, हा अपघात जपानच्या समुद्र किनाऱ्यापासून 300 किमी दूर घडला आहे. यातील एका एअरमनला वाचवण्यात यश आले. परंतु, उर्वरीत स्टाफचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

    दोन देशांकडून शोध मोहिम

    नौदलाने आपल्या बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे. यासाठी क्रूमध्ये डॉक्टरांची सुद्धा मदत घेतली जात आहे. सी-130 मध्ये 5 आणि एफ-18 विमानात दोन असे 7 जण तैनात होते असे सांगितले जात आहे. जपानने सुद्धा आपल्या तटरक्षकांच्या मदतीने 4 एअरक्राफ्ट आणि तीन जहाज शोध मोहिमेसाठी पाठवले आहेत. अमेरिकेने जारी केलेल्या माहितीनुसार, इव्हाकुनी येथील मरीन कॉर्प्स एअर स्टेशनवरून विमानांनी उड्डान घेतली होती. नियमित संयुक्त सरावाचा भाग म्हणून त्यांची ट्रेनिंग सुरू होती. परंतु, हवेत इंधन भरताना अचानक हा अपघात घडला. याबाबत सविस्तर चौकशी सुद्धा केली जात आहे.

Trending