आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवला-मनमाड महामार्गावर कार-टेम्पोच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर कारचा चुराडा झाला. - Divya Marathi
अपघातानंतर कारचा चुराडा झाला.

नाशिक - येवला-मनमाड महामार्गावर अनकाई बारी येथे बुधवारी पहाटे टेम्पो व कार समोरासमोर धडकून कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत ३ महिला, २ पुरुष व एका मुलाचा समावेश आहे.


कोपरगावचे बाबासाहेेेब मुरलीधर आनाड (६०) हे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवासह इंदूरला असलेली बहीण भीमाबाई बापू रोकले यांना दिवाळी सणासाठी आणण्यासाठी गेले होते. बुधवारी पहाटे अनकाई बारीजवळ आयशर टेम्पो येवल्याहून मनमाडकडे हा जात असताना त्याची समोरून येवल्याकडे येणाऱ्या मारुती इर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली. आनाड कुटुंबातील श्रीनाथ हा कार चालवत होता. समोरून येणाऱ्या टेम्पोवर इर्टिगा जाऊन धडकल्याची पोलिसांनी माहिती दिली.

 

मृत प्रवाशांची नावे
बाळासाहेब मुरलीधर आनाड (६०), पत्नी इंदूबाई आनाड (५५), मुलगा श्रीनाथ आनाड (२५ तिघेही रा. शारदानगर, कोपरगाव), मुलगी मोहिनी गणेश खांदवे (३५),नातू हरी गणेश खांदवे (५, दोघेही तेलाखुंट, सर्जेपुरा, नगर) आणि बहीण भीमाबाई बापू रोकले (७०, इंदूर). 

 

कन्येने दिला अग्निडाग :  मोहिनी व हरी खांदवे यांच्यावर नगर येथे, तर बाळासाहेब, इंदूबाई, श्रीनाथ अनाड व भीमाबाई यांच्यावर कोपरगावमध्ये सायंकाळी अंत्यसस्कार करण्यात आले. विवाहित कन्या भाग्यश्री चेतन वैद्य हिने कुटुंबातील चौघांना अग्निडाग दिला.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा..अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...