Home | National | Delhi | Six people death in road accident in jaipur delhi national highway

भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, घरातून आनंदात निघाले होते कुटुंब 4 तासांनी आली मृत्यूची बातमी

रिलिजन डेस्क | Update - Sep 10, 2018, 02:36 PM IST

जयपूर-दिल्ली नॅशनल हायवेवर भिवाडी भागात जयसिंहपुरा गावाजवळ रविवारी सकाळी 4 वाजता कार-ट्रकच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्य

 • Six people death in road accident in jaipur delhi national highway

  जयपूर - जयपूर-दिल्ली नॅशनल हायवेवर भिवाडी भागात जयसिंहपुरा गावाजवळ रविवारी सकाळी 4 वाजता कार-ट्रकच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण जयपुरवरून दिल्लीला येत होते. यामधील चार लोक एकाच कुटुंबातील तर दोन लोक जयपूर जातीवाला भागातील रहिवासी होते. दोन्ही कुटुंब नातेवाईक होते. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रोहतकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


  कारचा झाला चुराडा, गेट कापून शव बाहेर काढले
  अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली. लोकांनी पोलिसांना फोन करून ट्रकच्या खाली दबलेल्या कारमधील लोकांना गेट कापून बाहेर काढले आणि बावल हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. या अपघातामध्ये ढाणी निवासी चंपी (35), दोन वर्षांचा मुलगा आर्यन, लिच्छो (30), नरेश, सुनील (24) व पत्नी रेखा (20) यांना मृत घोषित करण्यात आले. चंपी यांची पत्नी अनिता यांना पुढील उपचारासाठी रोहतकला पाठवण्यात आले.


  प्रत्येक सणाला दिल्लीवरून घरी येत होते
  या अपघातातील सर्व सदस्य तीन-चार वर्षांपासून दिल्लीमध्ये राहून काम करत होते. प्रत्येक सण आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे जयपूरला यायचे. सहा सप्टेंबरला ढाणीपासून नईनाथ महादेव मंदिरात जाणाऱ्या वार्षिक यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी हे दिल्लीवरून येथे आले होते. सात सप्टेंबरला सकाळी यात्रेमध्ये सहभागी होऊन आठ तारखेला सकाळी घरी आले. त्यानंतर रात्री शिवदासपुरा येथून कानोताजवळ स्थित जीतावाला गावात गेले. तेथून त्यांनी नातेवाईक सुनील आणि रेखाला सोबत घेतले आणि रात्री एक वाजता जीतावाला येथून दिल्लीला निघाले. परंतु रस्त्यामध्येच अपघातामध्ये सर्वांचा मृत्यू झाला.

Trending