आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्दाम जळीतप्रकरणी पीएसआयसह ६ जणांवर गुन्हा, दोघे जण अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हिमायतनगर येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिस ठाण्यातच शेख सद्दाम या तरुणाने जाळून घेतल्याच्या प्रकरणात हिमायतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह सहा जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना तातडीने अटक करण्यात आली असून अन्य चार आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


शे. सद्दाम शे.अहेमद याने नांदेडला न्यायाधीश व पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याची पत्नी व दोन मुले माहेरी गेली होती. पत्नीला व मुलांना आणण्यासाठी गेलो असता सासरा, मेव्हणा व इतर दोघांनी मारहाण केली. याबाबतची तक्रार देण्यासाठी हिमायतनगर ठाण्यात गेलो असता पोलिसांनी  संतोष जिचकार याच्या सांगण्यावरून तक्रार घेतली नाही. उलट मलाच  उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे आणि जमादार संतोष  राणे यांनी जबर मारहाण केली.  मला न्याय मिळाला नसल्याने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतल्याचे सांगितले. सद्दामचा जबाब हिमायतनगर  ठाण्यात रात्री आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. मुदिराज यांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे    हिमायतनगर ठाण्यात फौजदार काळे, संतोष जिचकार, जमादार राणे, शे. सिराज शे. सरदार, शे. सरदार, जिशान मिरझा या सहा जणांवर कलम ३०६, ३९२, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  शे. सिराज शे. सरदार, शे.सरदार या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना केल्याची माहिती पो. नि. रवींद्र बोरसे यांनी  दिली.