आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामसवाडी येथे सहा वर्षीय नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायखेडा - गोदाकाठ परिसरातील गावात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली असून, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास सहा वर्षांचा नर बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना तामसवाडी येथील भगवान आरोटे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. वनविभाग व गोदाकाठमधील ग्रामस्थ सध्या सायखेडा परिसरात दिवसेंदिवस बिबटे पिंजऱ्यात येत असल्याने बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येने भयभीत झालेला आहे. वनविभागाने ग्रामस्थांना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी इतर उपाययोजना करण्याची व तसे प्रशिक्षण देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. 


गोदाकाठ भागात महाजनपूर येथे तीन बिबटे पकडले गेले अाहे. याआधी चिंधू सोनवणे यांच्या मांजरगाव येथील शेतात पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर शिंगवे येथील शेतमजुरावर हल्ल्याची घटना, सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, चाटोरी येथे शेळी व वासरी ठार केल्याच्या घटना घडलेल्या अाहेत. 


या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद हाेत नसून तेथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली जीव मुठीत धरून शेतावर कामासाठी जात आहेत. गोदाकाठमधील गावात मागील काही दिवसांत बिबट्याच्या दहशतीत वाढ झाली अाहे. इतर ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यांत अद्यापपर्यंत बिबट्या पकडला न गेल्याने दहशत कायम आहे. तामसवाडी येथे बिबट्या पिंजऱ्यात पकडला गेल्याची माहिती मिळताच वनविभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनसेवक भैया शेख, भरत माळी यांनी जेरबंद बिबट्याला ताब्यात घेत निफाडला नेले. 

बातम्या आणखी आहेत...