आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबितची कारवाई करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी व जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी हा निर्णय घेतला आहे. माळशिरस तालुक्यातील स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवसभर राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार भारत भालके, माजी आमदार गणपतराव देशमुख, राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह इतर नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीवर चर्चा केली तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा सदस्यांना निलंबितची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विरोधी पक्षाला मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामुळे आता विषय समिती निवडीत बाजी मारता येईल का? त्याची व्यूहरचना करण्यासाठी शुक्रवारी दिवसभर राष्ट्रवादी भवनमध्ये ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, राजन पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी तर १४ रोजी सभापती निवडीचा कार्यक्रम आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर व्यूहरचना कशी असेल, सभापती पदाचे उमेदवार कोण ? यावरही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.
राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापच्या नेत्यांमध्ये काथ्याकूट करण्यात चर्चा असून शहरप्रमुख हरिभाऊ चाैगुले यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हाचे संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, असा आरोप करत शिवसैनिक सावंतांवरही कारवाई करण्याची मागणी करत आले. याची दखल घेत सोलापूर व उस्मानाबाद शिवसैनिकांची शनिवारी दुपारी मुंबईतील 'मातोश्री'वर बैठक घेण्यात आली. या बैठकीस पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, उप जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, प्रकाश वानकर आदी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तानाजी सावंत समर्थकांना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पुरुषोत्तम बरडे यांना सर्वाधिकार देण्यात आले असून ते आता पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील.
मोहिते कुटुंबातील दोघासह....
बैठकीस माजी आमदार गणपतराव देशमुख, राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, रणजितसिंह शिंदे, लतीफ तांबोळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असूनही जि.प. अध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, समिती सभापती निवडीबाबत जिल्हास्तरावरील सर्व नेत्यांची बैठक झाली, बैठकीत चर्चाही केली आहे. आमच्याकडे बहुमतच नाही, यामुळे निर्णय काय घ्यायचा? जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीनंतर काय निर्णय घ्यायचा यावरही चर्चा झाली. समिती निवडीबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमधील शिवसेनेचा एकही नेता वा सदस्य बैठकीस उपस्थित नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.