Crime / शाळेचे स्नेहसंमेलन सुरू असताना सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला बलात्कार

आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल

प्रतिनिधी

Jun 06,2019 09:53:54 AM IST

गंगापूर - अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीस गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

कानडगाव येथील आरोपी ज्ञानेश्वर शेषराव सोलट (२१) याने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला १५ फेब्रुवारी २०१९ रोजी शाळेचे स्नेहसंमेलन संपल्यानंतर शाळेतील खोलीत बळजबरीने ओढून तिचा विनयभंग करून त्याचे मोबाइलवर फोटो काढले होते. त्यानंतर मुलीचे आईवडील ऊसतोडणीला गेले असता मार्च महिन्यामध्ये आरोपी ज्ञानेश्वर सोलाटने रात्री घरात प्रवेश करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर पुन्हा ५ जून रोजी सकाळी मुलगी रस्त्याने जात असताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने नकार देताच तिचा पाठलाग करून विनयभंग केला व तिच्या आईवडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

X
COMMENT