आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sixteen Years Later, Director Priyadarshan Will Return With A Sequel Of Film 'Hangama'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोळा वर्षांनंतर 'हंगामा'च्या सिक्वेलसह परतणार दिग्दर्शक प्रियदर्शन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉक्स ऑफिसवर 'हेरा फेरी', 'हंगामा', 'मालामाल वीकली', 'चुप चुपके' आणि 'भूल भुलैया' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी परत येत आहेत. त्यांनी आपल्या हंगामा २ चित्रपटाची घोषणा केली आहे. हा मूळ हंगामा २००३ मध्ये आला होता, आता ते सिक्वेल घेऊन येणार आहेत. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. शिवाय हा एक कौटुंबिक िवनोदी चित्रपट असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रियदर्शनने सांगितले...  १६ वर्षापासून मी कोणताही हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. पण आता मी विनोदी आणि दुटप्पी अर्थ न घेता फुल ऑन कॉमेडीसह परत येत आहे. माझ्या बाकीच्या विनोदी चित्रपटांप्रमाणेच 'हंगामा 2' हा एक सुबक कौटुंबिक चित्रपट असेल. मला माहित आहे 'हंगामा' रिलीज होऊन १६ वर्षे झाली आहेत पण लोक अजूनही विसरलेले नाहीत. तसेच, निर्मात्यांचा व्हिनस रेकॉर्ड्स आणि टिप्सशी माझा चांगला संपर्क आहे. मी त्यांना 'गरम मसाला' आणि 'हलचल' सारखे अप्रतिम चित्रपट दिले आहेत. मला 'तेज' वगळता माझे सर्व चित्रपट मला आवडतात कारण त्या एका चित्रपटात चूक झाली होती, ते मला आजही आठवतेय.

फक्त मुख्य भूमिकेत होणार बदल मूळ चित्रपट जेथे संपला होता तेथून हंगामा २ची पटकथा सुरू हेाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रियदर्शन म्हणाले, नाही, मुळीच नाही. ही पटकथा एकदम नवी काेरी असेल. आम्ही याचे टायटल हंगामा २ ठेवले कारण यात मस्ती धमाल आणि खोडकरपणा सर्व काही असेल. परेश रावल, शक्ती कपूर आणि राजपाल यादव चित्रपटात दिसतील. फक्त मुख्य भूमिकेतील जोडी अक्षय खन्ना आणि रिमी सेन यांना बदलण्यात येईल. लवकरच हंगामा २ साठी नवीन रोमँटिक जोडीची घोषणा करणार आहोत. हा पूर्णपणे टिपिकल प्रियदर्शन चित्रपट असेल. प्रियदर्शन यांचा शेवटचा चित्रपट 'रंगरेज' होता, जो २०१३ मध्ये रिलीज झाला होता.