आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके प्रकरणात सहा जणांविराेधात सोळाशे पानांचे दाेषाराेपपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणात अार्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याच्यासह एकूण सहा जणांविराेधात १६०० पानी पुरवणी दाेषाराेपपत्र विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात सोमवारी सादर केले. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदार अाणि बँकेची एकूण दाेन हजार ९१ काेटी रुपयांची फसवणूक झाल्याचे अातापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अार्थिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस अायुक्त नीलेश माेरे यांनी दिली.  


शिरीष कुलकर्णी याच्यासाेबत डीएसकेंच्या भावाचा जावर्इ केदार वांजपे, त्याची पत्नी सर्इ वांजपे, मेहुणी अनुराधा पुरंदरे, डीएसके कंपनीचे सीर्इअाे धनंजय राजाभाऊ पाचपाेर, फायनान्स अधिकारी विनयकुमार राघवेंद्र बाडगंडी यांच्याविराेधात सदर १६०० पानी पुरवणी दाेषाराेपपत्र पाेलिसांनी दाखल केले अाहे. यामध्ये मूळ दाेषाराेपपत्र १६३ पानी असून पाेलिसांनी प्रथमच न्यायालयात कागदाेपत्री दाेषाराेपपत्र सादर न करता प्रत्येक अाराेपीविराेधातील दाेषाराेपपत्र स्वतंत्र पेनड्राइव्हमध्ये साॅफ्ट काॅपीत सादर केले अाहे. १७ मे राेजी अार्थिक गुन्हे शाखेने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह एकूण १३ जणांविराेधात ३७ हजार पानी दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले हाेते. यामध्ये डीएसके यांनी नऊ कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार, बँका, कर्जराेखे व जमीन व्यवहार या माध्यमातून दाेन हजार ४३ काेटींची फसवणूक केल्याचे पाेलिसांनी सांगितले हाेते. 


संबंधित अाराेपींनी पैशांचा अपहार कशा प्रकारे केला तसेच ठेवींच्या स्वरूपात स्वीकारलेल्या पैशांचा गैरव्यवहार कुठे केला याबाबत पाेलिसांनी तपास करून त्याबाबतची माहिती न्यायालयात दिली अाहे. फुरसुंगीची जमीन नातेवाइकांच्या नावावर कवडीमाेल भावात घेऊन ती जादा दराने डीएसके कंपनीकडे हस्तांतरित कशा प्रकारे करण्यात अाली. बँकांची रक्कम कुठे खर्च केली याबाबत अद्याप तपास करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...