आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापैकी एकही गोष्ट कमी असल्यास अर्धवट मानले जाते आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये स्कंदपुराणाला महापुराण म्हटले जाते. स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते.

श्लोक-

जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च।

याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।।

1. धन
मनुष्य जीवनाचे 4 प्रमुख आधार मानले गेले आहे. ज्याला धर्म ग्रंथांत 4 पुरुषार्थ म्हटले जाते. चारही पुरुषार्थांमधून सर्वात पहिला परुषार्थ म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे धन. धन कमावने प्रत्येक मनुष्यासाठी अनिवार्य मानले जाते. यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने धन कमावणे आवश्यक असते. धन नसेल तर सुख मिळत नाही आणि जीवनभर संघर्ष करावा लागतो. यामुळे धन कमावणे हे मनुष्यासाठी खुप महत्त्वाचे असते.

2. स्त्री
स्त्रीला अर्धांगिनी म्हटले जाते, कारण स्त्री शिवाय प्रत्येक पुरुष अर्धवट मानला जातो. कोणत्याही पुरुषाच्या जीवनाला पुर्ण करण्यासाठी त्यामध्ये स्त्री असणे आवश्यक असते. मनुष्य जीवनात कतीही यशस्वी झाला आणि त्याच्या जीवनात पत्नी नसेल तर जीवनात कमतरता राहून जाते.

3. आपत्य
आपत्य हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण अंग मानला जातो. सुखी आणि आनंदी कुटूंबासाठी कुटूंब पुर्ण होणे आवश्यक मानले जाते. आपत्य नसले तर कोणतेच कुटूंब पुर्ण होऊ शकत नाही. ज्या दाम्पत्याचे काही आपत्य नसते त्याच्या जीवनाचा मोठा भाग अर्धवट राहून जातो. यामुळेच मनुष्याच्या जीवनात आपत्य असणे गरजेचे असते.

4. संसारातील कामे
प्रत्येक मनुष्याच्या काहीना काही जबाबदा-या असतात, ज्या पुर्ण करणे त्यांचे कर्तव्य असते. सर्वांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पुर्ण केली पाहिजे. जो मनुष्य आपले काम करत नाही किंवा जबादा-या पुर्ण करत नाही. तो कधीच सुखी राहू शकत नाही. अशा मनुष्याच्या कुटूंबात आणि वैवाहिक जीवनात नेहमी क्लेश राहतो. या सर्वांपासुन दूर राहण्यासाठी मनुष्याने आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदा-या पुर्ण कराव्या.

5. शेती
धर्म ग्रंथांप्रमाणे, शेती करणे किंवा मातीसोबत जोडलेले राहणे हे प्रत्येकासाठी अनिवार्य मानले गेले आहे. जे लोक शेतीसाठी वेळ काढतात आणि काम करतात, त्यांना सुख आणि आनंद मिळतो. यासोबतच मातीसोबत जोडलेले राहिल्यावर आरोग्य चांगले राहते. यामुळे प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनातील थोडा वेळ शेतीमध्ये घालवावा. याशिवाय जीवन अर्धवट आहे.

बातम्या आणखी आहेत...