आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फाच्या पर्वतात हाेणारी तिसरी सर्वात आव्हानात्मक रेस; उणे 1 डिग्रीमध्ये पाच पर्वतांवर 10 हजार मीटरचे अंतर गाठण्याचे टार्गेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युफाेर्ट  - दक्षिण कॅराेलिनाच्या ब्युफाेर्टमध्ये ३४ व्या सत्राच्या  पिएरा-मँटा स्की माउंटेनिअरिंग रेसचे आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेचे १९८६ पासून नियमित आयाेजन केले जाते. यंदाच्या या स्पर्धेत एकूण चार दिवस इव्हेंटचा थरार रंगणार आहे. त्यामुळे १६ मार्च राेजी या स्पर्धेचा समाराेप हाेईल. या स्पर्धेत ६०० स्पर्धकांनी आपला सहभाग नांेंदवला. हे सर्व खेळाडू वैयक्तिक आणि सांघिक गटातून आपले काैशल्य पणास लावतात. पिएरा मँटाची स्की माउंटेनिअरिंग रेस म्हणजे बर्फाच्या पर्वतावर आयाेजित करण्यात येणारी जगातील तिसरा माेठी स्पर्धा मानली जाते. तसेच सर्वात आव्हानात्मक तिसरी स्पर्धा म्हणूनही ही रेस आेळखली जाते.   


आव्हानात्मक रेस :  स्पर्धकांना उणे १ डिग्रीपर्यंतच्या तापमानात ५ पर्वतांवरून एकूण १० हजार मीटरचे अंतर गाठावे लागते. यामध्ये चढ आणि उताराचा समावेश आहे. पिएरा मँटा हा फ्रान्समधील सर्वात माेठा स्की टुरिंग स्पाॅट आहे. हा मार्गावर बर्फ पडलेला असताे. 


नव्या रस्त्याचा शाेध : बर्फ पडत असल्याने या रेसच्या दरम्यान निश्चित असा काेणताही मार्ग नसताे. त्यामुळे स्पर्धक हे या आव्हानातून  रस्त्याचा शाेध घेतात आणि लक्ष्य गाठतात.

बातम्या आणखी आहेत...