आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Skiers Stranded In A Blizzard, Fortunately Survived, Survived A Major Accident At A Skiing Resort In Switzerland

हिमवादळात दबलेलेे स्कीअर्स, सुदैवाने वाचले, स्वित्झर्लंडच्या स्कीइंग रिसॉर्टमध्ये मोठा अपघात टळला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अँडरमाट : स्वित्झर्लंडच्या अँडरमाट शहरात बर्फाच्या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सकाळी स्कीइंग करणाऱ्या लोकांवर आपत्ती कोसळली. काही वेळापूर्वी हसण्या-खेळण्यात दंग झालेल्या व स्कीइंग करणारे कुटुंब हिमवादळात सापडले. यानंतर चार स्कीअर्स अडकले. नंतर स्वत:च बाहेर पडले. िहमवृष्टी इतकी वादळी होती की, हवामान विभागाने याला लेव्हल ३ कक्षेत ठेवले होते. म्हणजे हे वादळ धोकादायक होते. बचाव पथकाने हेलिकॉप्टरद्वारे मोहिम चालू ठेवली. परंतु तोपर्यंत सर्व लोक सुरक्षित ठिकाणी पोहचले होते. हिमस्खलनात दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. यात दहा ते बारा स्कीअर्स डोंगरावर असलेले दिसते आहे. वादळ आल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी गेले होते, असे सांगण्यात आले.