Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | skin care tips and shower bath information

शॉवरमध्येच व्हायला हवी त्वचेच्या काळजीची सुरुवात

दिव्य मराठी | Update - Mar 17, 2019, 12:02 AM IST

शोध सांगतात त्वचेच्या काळजीसाठी शॉवरपेक्षा चांगली जागा नाही...

 • skin care tips and shower bath information

  सोयीस्कर आणि परिणामकारक...
  जर तुम्ही शॉवर घेणार असाल तर त्वचेची स्वच्छता तिथेच केली जाऊ शकते. रात्री झोपण्याआधी शॉवर घेतल्यास तेथेच मेकअपही काढला जाऊ शकतो. थोड्या कोमट पाण्याने त्वचेची आतपर्यंत स्वच्छता होते. शॉवरनंतर लगेच नाइट क्रीम आणि सिरम लावल्याने ते त्वचेत चांगल्या प्रकारे शोषले जाते.


  कोणत्या प्रॉडक्ट्सचा वापर करू शकता-
  संवेदनशील किंवा कोरडी त्वचा असेल तर ज्यात कोरफड किंवा व्हिटॅमिन बी ५ असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा. ते त्वचेसाठी खूप सुरक्षित असतात. शॉवरमध्ये ते वापरल्यानंतरही त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होत नाही, ते कायम राहते.


  शॉवरमध्ये हे सौंदर्य नियमही अंगीकारू शकता...
  घाम आणि सनस्क्रीन हटवण्यासाठी जेंटल क्लेंजर आणि सोप-फ्री वॉशचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर स्किनवर इचिंगची तक्रार राहणार नाही, हे माइल्ड क्लेंजर्स शरीराची स्वच्छता बॉडी वॉश आणि साबणाप्रमाणेच करतात. फरक फक्त एवढाच की हे माइल्ड क्लेंजर्स त्वचेतील मॉइश्चर कायम ठेवतात, आवश्यक तेलही कायम ठेवतात.


  मॉइस्चरायजर लावण्यासाठीही शॉवरची वेळ सर्वात चांगली...
  शरीर व चेहऱ्यावर मॉइस्चरायजर लावण्यासाठी शॉवर ही सर्वात चांगली वेळ आहे. शोध सांगतात की, आंघोळीनंतर लगेचच लोशन आणि मॉइस्चरायजर लावल्याने त्वचेचे हायड्रेशन वाढते. मॉइस्चरायजर लावण्यास उशीर केल्यास तुम्ही त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी करता, त्यामुळे त्वचा कोरडी जाणवते.


  कोमट पाण्याने घेतलेला शॉवर यासाठी आहे फायदेशीर-
  हे प्रमाणित तर नाही, पण असे मानले जाते की, शॅम्पू, क्लेंजर्स आणि बॉडी वॉश कोमट पाण्यासोबत सर्वात जास्त परिणामकारक ठरतात. पाणी जास्त गरम नसावे कारण त्यामुळे त्वचेच्या वरच्या भागाचे नुकसान होते. हा वरचा भाग निघाला तर त्वचेवर कुठल्याही फ्रेगरन्स प्रॉडक्टची प्रतिक्रिया होऊ शकते.

Trending