Home | Maharashtra | Kokan | Thane | skywalk in ambarnath started soon

अंबरनाथ येथील स्कायवॉक पूर्णत्वाच्या मार्गावर

Agency | Update - May 20, 2011, 06:04 PM IST

अंबरनाथ येथीस स्कायवॉकचे बांधाकास पूर्णत्वास आले आहे.

  • skywalk in ambarnath started soon

    ठाणे - अंबरनाथ येथीस स्कायवॉकचे बांधाकास पूर्णत्वास आले असून, तो लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

    या स्कायवॉकचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या स्कायवॉकचे काम मूळ नकाशाप्रमाणे केले नसल्याने संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या आयुक्तांना नगराध्यक्षांनी तसे निवेदन पाठविले आहे. अंबरनाथ शहरात गेल्या दोन वर्षांपासून या स्कायवॉकचे काम सुरू आहे. उल्हासनगर, तसेच बदलापूर येथील स्कायवॉकवरून नागरिक ‘वॉक’ करू लागले आहेत. अंबरनाथला मात्र अद्याप काम सुरू असल्याबद्दल नगराध्यक्षांनी संताप व्यक्त केला.
    नागमोडी आकाराचा स्कायवॉक बांधताना ठेकेदाराने नागरिकांचे हित लक्षात न घेता स्कायवॉक अंबरनाथवासीयांच्या माथी मारल्याची चर्चा शहरात सुरू आहे.Trending