आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने पतीला चापट मारणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नव्हे; दिल्ली HC कडून पत्नीची निर्दोष मुक्तता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखाद्या महिलेने आपल्या पतीला लोकांसमोर चापट मारल्यास ते आत्महत्येचे कारण असू शकत नाही. एका महिलेवर आपल्या पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे आरोप लागले होते. परंतु, दिल्ली हायकोर्टाने तिची निर्दोष मुक्तता केली. याच दरम्यान झालेल्या सुनानणीत कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. जस्टिस संजीव सचदेवा यांनी दिलेल्या निकालानुसार, सामान्य परिस्थितीत इतरांसमोर एखाद्या व्यक्तीने आपल्याला चापट मारल्याने कुणी आत्महत्येचा विचार करणार नाही. चापट मारल्यास आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाईल असे मानता येणार नाही.


- संशयित आरोपी महिलेवर कारवाई पुढे ठेवण्यासाठी काहीही आधार नाही. सोबतच तिच्या विरोधात खटला चालवला तरीही काहीच निष्पन्न होणार नाही. तिच्या विरोधात खटला चालवणे म्हणजे, फक्त तिला त्रास देण्यासारखे होईल. सत्र न्यायालयाने संबंधित महिलेला भारतीय दंड विधान 396 अंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, हायकोर्टाने तो निकाल सुद्धा रद्दबातल ठरवला आहे. 
- 2 ऑगस्ट 2015 रोजी महिलेच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी पत्नीच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे आरोप लावले होते. स्थानिक न्यायालयाने 31 जुलै रोजी तिच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. कारण, आत्मत्येच्या दिवशी पत्नीने पतीला सर्वांसमोर चापट मारला होता. त्यालाच पोलिसांनी आत्महत्येचे कारण मानले होते.

बातम्या आणखी आहेत...