आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांतील थप्पड मारण्याची दृश्ये; अभिव्यक्तीचा प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष घई यांच्या 'कर्मा' चित्रपटात दिलीपकुमार अभिनीत पात्र, अनुपम खेर अभिनीत पात्राला थप्पड मारते. तेव्हा तो दहशतवादी म्हणतो की, या थप्पडचा आवाज फार दूरवर ऐकायला मिळेल. अभिनेत्री नूतनच्या पतीचा असा गैरसमज झाला होता की, नूतन ही सहकलाकार संजीवकुमार याच्या प्रेमात पडलेली आहे. आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तू संजीवकुमारला स्टुडिओत थप्पड मार असा दबाव नूतनच्या पतीने आणला. आपल्याकडे पत्नींना वारंवार अग्निपरीक्षा द्यावी लागते. नूतनने संजीवकुमारला थप्पड मारली, पण संजीवकुमारने याचा जाब विचारला नाही. कारण, नूतनची मजबुरी त्याच्या लक्षात आली. विवाहानंतर नूतनच्या पतीने 'सूरत और सीरत' नावाचा चित्रपट बनवला. ते नूतनवर शंका घ्यायचे. काही वर्षांनंतर घरातच शॉर्टसर्किटमुळे आग लागून त्यांचा त्यात जळून मृत्यू झाला. कुटुंबात मुले प्रश्न विचारतात, पण मोठ्यांकडे याचे उत्तर नसेल तर मुलांना सरळ थोबाडीत ठेवून देतात. अशा प्रकारे थप्पड म्हणजे आमची असमर्थता आणि अप्रामाणिकपणाचे कारण बनले आहे. व्यवस्थेकडे रोजी-रोटी आणि घरांची व्यवस्था यांची उत्तरे नसतील तर ते अन्याय वाढवतात. त्यांची थप्पड मारण्याची पद्धत वेगळी आहे. महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, जर तुम्हाला कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. अहिंसेच्या या देवतेला गोळ्या घातल्या गेल्या. गौरी लंकेश आणि दाभोलकर यांची हत्या एकाच रिव्हॉल्व्हरने झाली. तपासात हे पुढे निष्पन्न झाले की, गोडसे यानेही हेच रिव्हॉल्व्हर वापरले होते. 'हिस्ट्री ऑफ व्हॉयलेन्स' हा एक हॉलीवूड चित्रपट आहे, ज्यात एक किशोरवयीन मुलगा हिंसक होतो. पकडल्यानंतर तो हे सांगतो की, मी हे वडिलांकडूनच शिकलो. सलमान खान अभिनीत 'दबंग-१' मध्ये एक दृश्य आहे की, नायक आपल्या हिंसक सावत्र भावाला थप्पड मारतो. त्याने जर क्षमा मागितली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असे त्याला सांगितलेले असते. नायक क्षमा मागतो पण पोलिस चौकीच्या बाहेर आल्यानंतर तो आपल्या सावत्र भावाला पुन्हा थप्पड मारतो आणि पुन्हा क्षमा मागतो. क्षमा मागण्याची ही पद्धत म्हणजे याला 'दबंगई' म्हणतात. कधी कधी थप्पड मारणे म्हणजे अनेक दिवसांपासूनचा अन्याय सहन न झाल्याने केलेली प्रतिक्रिया म्हणावी लागेल. काही वेळा थप्पड मारणे हा प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार होय. अशा प्रकारे थप्पड हा चुंबनाला पर्याय बनतो. यशराज चोप्रा यांच्या 'लम्हे' चित्रपटातील एका दृश्यात नायक, नायिकेची विकलेली हवेली पुन्हा खरेदी करतो. त्या वेळी ते घर विक्री करणाऱ्याने बाजारभावापेक्षा अधिक दर सांगितल्याने त्याला एक थप्प्पड लगावण्यात आलेली असते. नायक त्याला दुप्पट पैसे देऊन पुन्हा आणखी एक थप्पड लगावतो. पण थप्पड मारणे ही काही पुरुषांचीच एकाधिकारशाही नाही. कधी महिलाही थप्पड मारतात. दोन शेजारणींच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्यांनाही थप्पडचा प्रसाद मिळतो. रशियन लेखक अँटन चेकॉव्ह यांच्या एका कथेमध्ये एक वयस्क महिला तिच्या पतीला मारहाण करते कारण नवऱ्याने कोणत्या तरी महिलेला लिहिलेले प्रेमपत्र तिच्या हाती लागलेले असते. अँटन चेकॉव्ह हे डॉक्टर होते. त्यांनी एमबीबीएस केलेले होते. पण लेखन हाच त्यांचा खरा व्यवसाय ठरला. ते म्हणतात की, औषधशास्त्राशी मी विधिवत लग्न लावलेले आहे, पण साहित्य ही माझी प्रेमिका आहे. खरे पाहता थप्पड ही एक अनोखी अभिव्यक्ती आहे. थप्पड मारणाऱ्याच्या बोटांचे वळ गालावर उमटलेले असतात, पण ते फिंगरप्रिंटचे पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले जाऊ शकत नाही. पडद्यामागील, जयप्रकाश चौकसे, चित्रपट समीक्षक jpchoukse@dbcorp.in