Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Sleeping Directions As Per Vastu

रात्री अधिकतर लोक ही चुकी करतात.. यात तुम्ही तर नाही ना.. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 04:33 PM IST

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार आपल्‍या आजुबाजुच्‍या वातावरणात अनेक उर्जा कार्यरत असतात.

 • Sleeping Directions As Per Vastu
  ज्‍योतिष शास्‍त्रानुसार आपल्‍या आजुबाजुच्‍या वातावरणात अनेक उर्जा कार्यरत असतात. त्‍या उर्जांसोबत आपण कशा पध्‍दतीने ताळमेळ बसवतो, याचा आपल्‍या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. अशाच पध्‍दतीचे एक काम म्‍हणजे झोपणे. तसे पाहिल्‍यास हे अतिशय सामान्‍य काम आहे. मात्र ज्‍योतिष शास्‍त्रानुसार आपल्‍या जीवनवार याचा मोठा प्रभाव पडत असतो. ज्‍या व्‍यक्ती दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपतात, त्‍यांच्‍या जीवनावर मोठा नकारात्‍मक परिणाम होत असतो.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे झोपावे आणि कसे नाही...

 • Sleeping Directions As Per Vastu

  असे झोपल्‍याने कमी होते शारीरीक उर्जा 

  वैज्ञानिक माहितीनुसार पृथ्‍वीच्‍या दोन्‍ही ध्रुवांवर म्‍हणजेच उत्‍तर आणि दक्षिण ध्रुवांवर चुंबकीय क्षेत्र असते. त्‍यामुळेच तुम्‍ही उत्‍तर दिशेकडे तोंड आणि दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपत असाल तर याचा जीवनावर नकारात्‍मक परिणाम होतो. यामुळे शारीरीक उर्जा कमी होते. मानसिक स्‍वास्‍थ्‍य बिघडते आणि हृदयाच्‍या काम करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍येही बिघाड होतो.

 • Sleeping Directions As Per Vastu

  होऊ शकतो निद्रानाशाचा विकार 
  उत्‍तर दिशेकडे धनात्‍मक प्रवाह असतो आणि दक्षिण दिशेकडे ऋणात्मक प्रवाह. आपले डोके धनात्‍मक प्रवाह आणि पायांचे स्‍थान ऋणात्मक प्रवाहाला अनुकुल असते. त्‍यामुळे जर आपण उत्‍तर दिशेकडे डोके ठेवून झोपत असू तर उत्‍तर दिशेचा धनात्‍मक प्रवाह आणि डोक्‍याचा धनात्‍मक प्रवाहाचे तरंग एकमेकांना विरुध्‍द दिशांना दुर लोटतील. यामुळे डोकेदुखी व अस्‍वस्‍थ वाटुन तुम्‍हाला चांगली झोप येणार नाही. 

   

 • Sleeping Directions As Per Vastu

  देवांचा निवास 
  आपल्‍या शास्‍त्रांमध्‍ये हे सांगितले आहे की, दक्षिणेकडे डोके व उत्‍तरेकडे पाय ठेवून झोपले पाहिजे. पूर्व दिशेकडे देवतांचा आणि इतर अलौकिक शक्‍तींचा वास असतो. त्‍यामुळे झोपताना कधीही पूर्व दिशेकडे पाय असू नये. पूर्व दिशेकडे सुर्याचा प्रवाह असतो त्‍यामुळेही या दिशेकडे पाय ठेवून झोपणे अशुभ मानले गेले आहे. 

   

Trending