Slow down / मंदीचे सावट : उत्पादन क्षेत्रात १५ महिन्यांतील सर्वात जास्त नरमाई, पीएमआय ५१.४% वर

ऑगस्टमध्ये पीएमआय निर्देशांकात जुलैच्या तुलनेत जास्त घट

वृत्तसंस्था

Sep 03,2019 09:02:00 AM IST

नवी दिल्ली - वाहनांच्या विक्रीमध्ये आॅगस्टमध्ये दाेन दशकांतील सर्वात माेठी घसरण नाेंद झाल्यावर आता उत्पादन क्षेत्रात १५ महिन्यांची सर्वाधिक नरमाई नाेंद झाली आहे. विक्री वाढीव्यतिरिक्त उत्पादन वाढ आणि राेजगारात घट यामुळे उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला असल्याचे एका मासिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यानुसार विक्री, उत्पादन आणि राेजगारातील वाढ मंदावल्याने उत्पादन क्षेत्राचा वेग मंदावला आहे.


आयएचएस मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआयड) या वर्षाच्या आॅगस्टअखेर घसरून ५१.४ वर आला. मे २०१८ नंतरचा हा सर्वात खालचा स्तर आहे. जुलैमध्ये उत्पादन निर्देशांक ५२.५ हाेता. पीएमआयच्या बहुतांश निर्देशांकामध्ये जुलैमध्ये घट झाली आहे. त्यावरून नरमाईचा विस्तृत अंदाज येताे. उत्पादनाचा वेग मंदावलेला असला तरीही सलग २५ व्या महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५० च्या वर आहे. हा इंडेक्स ५० च्या वर असेल तर या क्षेत्राचा विकास झाला आहे, असे मानले जाते. इंडेक्स ५० च्या वर जितका असेल तितका विकासाचा वेग कळताे. ५० च्या खाली असेल तर उत्पादन घटीचा अंदाज येताे. शुक्रवारी जाहीर झालेले चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा विकासदरही निराशाजनक असून ताे घसरून पाच टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या सहा वर्षांचा नीचांक आहे. त्याचबराेबर सलग पाचव्या तिमाहीत विकास दरात घट झाली आहे.

नगदीची अडचण, कर्ज अनुपलब्धतेचा करावा लागताेय सामना
अनेक कंपन्यांनी सर्वेक्षणामध्ये नगदीची अडचण आणि कर्ज न मिळण्याची समस्या सांगितली. आयआचएस मार्केटचे मुख्य अर्थतज्ञ पाॅलियाना डि. लिमा म्हणाले, नवीन कंत्राट, उत्पादन आणि राेजगार यासारख्या महत्त्वाच्या उपक्षेत्रांतही घट झाली आहे. आॅगस्टमध्ये वाढता अर्थव्यवस्थेत नरमाई आली असून उत्पादन क्षेत्रात खर्चाचा ताण वाढत आहे. आॅगस्टमध्ये विक्रीमध्ये १५ महिन्यांतील सर्वात घसरण झाली आहे.

खर्चवाढ, महागाईमुळे आरबीआय रेपाे रेट कमी करण्याची शक्यता
विक्री घटण्याचा परिणाम उत्पादन, राेजगारावर झाला. मे २०१८ नंतर पहिल्यांदाच कारखान्यांच्या इनपुट सामग्रीची खरेदी कमी झाली. उत्पादन वाढ गेल्या वर्षभरातल्या नीचांकीवर आली आहे. व खर्चवाढीचे प्रमाण गेल्या नऊ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. खर्चात वाढ झाली तर आरबीआय रेपाेरेट कमी करू शकते, असे पाॅलियाना म्हणाल्या.


पीएमआयवरून कळते देशाच्या आर्थिक प्रकृती
पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) हा सेवा,उत्पादन क्षेत्राची आर्थिक प्रकृती माेजण्याचा निर्देशांक आहे. व्यवसाय व उत्पादन क्षेत्रातील स्थिती कळण्यासाठी हा निर्देशांक जास्त बघितला जाताे. यावरून एखाद्या देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतात. चांगला पीएमआय म्हणजे देशाची आर्थिक स्थिती सुधारत असून मागणी वाढत आहे. कंपन्यांचे उत्पादन वाढले तर नाेकरीच्या संधी वाढतात.

आठ प्रमुख उद्याेगांवरही सुस्तीचे सावट
देशाच्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरातही घट झाली आहे. प्रमुख क्षेत्रांची वाढ जुलै २०१९ मध्ये जुलै २०१८ च्या तुलनेत घटून २.१ % वर आली आहे. गेल्या वर्षात हा विकास दर ७.३ % हाेता. काेळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादन, स्टील, खते, सिमेंट आणि वीज ही प्रमुख आठ क्षेत्रे आहेत.

अर्थमंत्र्यांच्या प्रयत्नांचा बाजारावर परिणाम नाही : सियाम
सियामचेअध्यक्ष राजन वाधेरा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांच्या विक्रीमध्ये ३० टक्क्यांची सर्वाधिक घट तसेच प्रवासी वाहनांच्या विक्रीतही घसरण झाली. अशा स्थितीत अर्थमंत्र्यांनी या क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा बाजारावर परिणाम झालेला नाही.

X
COMMENT