आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा बचाव केला. मंगळवारी सीतारमण म्हटल्या होत्या की, नवीन पिढी नवीन कार कारचा ईएमआय भरण्याऐवजी ओला-उबर सारख्या सेवांचा वापर करणे पसंत करत आहेत. दरम्यान विविध कारणांमुळे वाहन क्षेत्रात मंदी आली आहे. सीतारमण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असल्याचे नितिन गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्रीमध्ये झालेल्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. ई-रिक्षाच्या वाढत्या विक्रीमुळे सामान्य ऑटो रिक्षाच्या विक्रीत घट झाली आहे. याशिवाय देशभरात सार्वजनिक परिवहन वाहनांना मिळणारी पसंती देखील मंदीचे एक कारण आहे.
जीएसटीवर आर्थिम मंत्रालय घेणार निर्णय
वाहन क्षेत्राने मंदीतून सावरण्यासाठी सरकारकडे मदत मागितली होती. वाहनांवरील जीएसटी 28% कमी करून 18% करण्याची मागणी केली होती. यावर गडकरी म्हणाले की, जीएसटीबाबतचा कोणताही निर्णय जीएसटी परिषदच घेऊ शकते. जीएसटी कमी करण्यासाठी सीतारमण इतर राज्यांशी बोलतील याचा मला विश्वास आहे.
यापूर्वी सीतारमण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जीएसटीवर विचारलेल्या एका प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. यावर बोलताना त्या एवढेच म्हणाल्या की, मी एकटीच जीएसटीबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.