आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपी वाढवण्यासाठी लघु उद्योगची जबाबदारी : नितीन गडकरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - परिवहन खाते कायम राहताना इतर खाती बदलली गेल्याने मी कुठेही नाराज नाही. देशाची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असून देशाचा जीडीपी आणि रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आपल्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मध्यम व लघु उद्योग खात्याची जबाबदारी सोपविली असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना व्यक्त केले.


केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिपदाची  शपथ घेतल्यावर प्रथमच नागपुरात दाखल झालेल्या गडकरी यांचे शनिवारी विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी निवासस्थानी बोलताना गडकरी यांनी जलसंपदा खाते काढून मध्यम व लघु उद्योग खात्याची जबाबदारी मिळाल्याने आपण अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, माझीही काही क्षमता असून मला मर्यादा मािहती आहेत. मध्यम व लघु उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून याच क्षेत्रात देशाचा जीडीपी आणि रोजगार वाढीची मोठी क्षमता आहे. 


सिंचन वाढवण्याची जबाबदारी माझी
महाराष्ट्रात बळीराजा योजनेतील १०८ आणि पंतप्रधान सिंचन योजनेतील २६ प्रकल्प मी स्वत: लक्ष घालून पूर्ण करणार आहे. नगर जिल्ह्यातील नळवंडे धरणाचेही काम सुरु होणार आहे. पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्राची जबाबदारी मी घेतली आहे, असे नमूद करून गडकरी यांनी सांगितले की, रस्ते विभागाच्या वतीने महाराष्ट्रात १७० ब्रिज कम बंधारे बांधणार आहोत.