आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
चेन्नई - भारतातील एका गावात चप्पल आणि बूट वापरण्यास मनाई आहे. या गावात जवळपास 130 कुटुंब वास्तव्यास आहेत. यातील अधिकतर लोक शेतकरी किंवा मजूर आहे. येथील राहणारा एकही जण गावात चप्पल किंवा बुट घालत नाही. मीडिया रिपोर्टनुसार गावातील एका देवीच्या सन्मानार्थ हा नियम पाळत असल्याचे सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे हा नियम कोणावरही जबरदस्तीने लादण्यात आला नाही. कोणालीह बळजबरीने असे करण्यास सांगण्यात आले नाही. तर लोक स्वच्छेने या नियमाचे पालन करतात. गावाबाहेर जाण्यासाठी लोक हातात बुट-चप्पल घेऊन जातात.
गावात प्रवेश करताचा हातात घेतात चप्पल
> अंदमान नावाचे हे गाव तमिळनाडू राज्यात आहे. राजधानी चेन्नईपासून 450 किमी अंतरावर हे गाव आहे. येथे चप्पल-बूट घातलेला एकही व्यक्ती आढळून येणार नाही.
> येथील 70 वर्षीय रहिवासी मुखन अरुमुगम यांनी सांगितले की, गावातील एका जलाशयाजवळील एका लिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गावाला जगप्रसिद्ध बनविणाऱ्या या गोष्टीने जन्म घेतला.
> त्यांनी सांगितले की, लोक गावात प्रवेश घेण्यापूर्वी त्या ठिकाणी आपले पायातील बुट-चप्पल काढून हातात घेतात. गावात फक्त वयोवृद्ध आणि आजारी लोक बुट-चप्पल पायात ठेवतात.
> गावातील एका महिलेने सांगितले की, गावाबाहेर जाताना देखील ते बुट-चप्पलांची काळजी करत नाहीत. गावाबाहेरून गावात येणाऱ्या लोकांना देखील हा नियम सांगितला जातो. पण त्यांच्यावर कोणताही दबाब टाकला जात नाही.
हे आहे यामागचे मुख्य कारण
> गावात राहणारी 10 वर्षीय अंबुने नितीने सांगितले की, 'माझ्या आईने मला सांगितले की, मुथियालम्मा नावाची एक शक्तिशाली देवी आपल्या गावची रक्षा करते आणि आम्ही त्याच देवीच्या सन्मानार्थ चप्पल-बूट वापरत नाहीत.' पुढे बोलतांना ती म्हणाली की, 'मला जर वाटलं तर मी चप्पल घालू शकते पण तसे करणे एखाद्या चांगल्या मित्राचा अपमान करण्यासारखे होईल.' लोकांच्या मते, कोणी हे काम कोणाच्या दबावामुळे नाही तर स्वखुशीने करतात.
अशाप्रकारे सुरु झाली ही परंपरा
> ही परंपरा सुरु होण्यामागे खूप मोठी विचित्र गोष्ट आहे. गावातील 62 वर्षीय लक्ष्मणन वीरभद्र यांच्या मते, 70 वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी गावाबाहेर एका लिंबाच्या झाडाखाली मुथियालम्मा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती.
> पुजारी देवाचा श्रृगांर करून पूजा करत होते. तेवढ्यात एक युवक तेथे बुट घालून मूर्तीजवळून गेला. वीरभद्रच्या मते, त्या दिवशी व्यक्ती पाय घसरून पडला. संध्याकाळ होईपर्यंत त्याला ताप आला. महिन्याभरानंतर त्याचा ताप कमी झाला.
> पण वीरभद्रच्या मते, त्या व्यक्तीच्या चुकीमुळे देवी नाराज झाली की दुसऱ्या कारणामुळे त्याला त्रास सहन करावा लागला हे सांगता येणार नाही. पण या घटनेनंतर या गावातील लोक बुट-चप्पल न घातला राहतात. असे राहणे त्यांच्या जीवनाचा एक घटक बनले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.