आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:ढकलत ढकलत चोरून नेत होता मौल्यवान हिरा, हा आहे जगातील सर्वात चिमुरडा चोर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - हिऱ्याच्या कोणत्याही कारखान्यामधून चोरी करणे ही सोपी गोष्ट नाही. फक्त CCTV कॅमरेच नव्हे तर याठिकाणी इतर सुरक्षा व्यवस्थाही एवढी चोख असते की, कोणाला हिरा लपवूनही बाहेर नेता येत नाही. पण या लहानग्या चोराने सर्वांनाच धक्का दिला. याला पाहिल्यानंतर हा जगातील सर्वात लहान चोर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


गुजरातच्या सूरत आणि मुंबईमध्ये हिऱ्याचा मोठा व्यापार आहे. दोन्ही ठिकाणी अगदी लहान लहान घरांमध्येही हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम होते. पावसामध्ये विविध किडे, माश्या मोठ्या प्रमाणावर येत असतात. पण एखाद्या मुंगळ्याने हिऱ्याच्या चोरीचा प्रयत्न केल्याचे कधी ऐकिवात आले नाही. पण कारखान्यातील कर्मचाऱ्याने हे पाहिले. त्याने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर तो पोस्टदेखिल केला. मात्र यात हिऱ्याची किंमत किंवा ठिकाणाचा उल्लेख नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...