आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट एसी : मोबाइलपेक्षा लहान आकाराच एसी, शर्ट किंवा टीशर्टमध्ये फिट करून घेऊ शकाल थंडाव्याचा अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सोनीने मोबाइलपेक्षा लहान एसी (एअर कंडीशनर) तयार केला आहे. हा एसी आपल्या टीशर्ट आणि शर्टमद्ये फिट होतो. रेओन पॉकेट असे या एसीचे नाव आहे. हा एसी तुम्हाला उन्हाळ्यात चोवीस तास थंडावा तर हिवाळ्यात गर्मी देईल. 

कंपनीच्या मते, कोणताही युझर या एसीला आपल्या मानच्या खाली परिधान करू शकतो. यासाठी विशेष प्रकराची बॅग तयार करण्यात आली आहे. ही बॅग लहान, मध्यम मोठ्या आकारात उपलब्ध होईल. 


पेल्टियर एलिमेंटने तयार केला आहे एसी

> रेओन पॉकेट एसी थर्मोइलेक्ट्रिक पेल्टियर एलिमेंटने तयार केला आहे. हा एलिमेंट जलदरित्या गरम आणि थंड होतो. कार कूलर आणि वाइन कुलर्समध्ये या एलिमेंटचा उपयोग करण्यात येतो. याला कमी पॉवरची गरज असते.


> या स्मार्ट एसीमध्ये लिथियम ऑयन बॅटरी लावण्यात आली आहे. दोन तास चार्जिंग केल्यानंतर दिवसभर त्याचा वापर करण्यात येईल. हा एअर कंडीशनर ब्लूटूथ 5.0 एलई कनेक्टेड फोनला सपोर्ट करतो.


> सध्या हा एसी फक्त जपानच्या मार्केटमध्ये दाखल करण्यात आला आहे. याचा लोकांकडून येणारा प्रतिसाद पाहून हा एसी इतर देशांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...