आपल्या घरातील स्मार्ट बल्बची गरज ओळखा

स्मार्ट बल्ब सर्वसाधारपणे एलईडी नसतात. हे केवळ सॉकेटमध्ये फिट होऊन उजेड देत नाहीत... यापेक्षा याचा आणखी जास्त उपयोग करू शकता...

दिव्य मराठी

Mar 17,2019 12:03:00 AM IST

स्मार्ट बल्ब सर्वसाधारपणे एलईडी नसतात. हे केवळ सॉकेटमध्ये फिट होऊन उजेड देत नाहीत... यापेक्षा याचा आणखी जास्त उपयोग करू शकता. याला स्मार्ट संबोधण्यामागचे कारण म्हणजे तो थेट फोनशी जोडला जातो व यामुळे अनेक शक्यतांची द्वारे उघडली जातात.


अॅपद्वारे मंद उजेड होतो : स्मार्ट बल्बचे बेसिक फीचर आहे डीम (मंद उजेड) होणे. तो डिम करण्यासाठी डिमर स्वीच बसवण्याची गरज पडत नाही. केवळ लॅम्प किंवा झुंबरात हा बल्ब लावावा लागतो आणि याच्याशी संबंधित अॅपद्वारे हा डिम किंवा प्रखर उजेड देणारा बल्ब करू शकतो.


कुठूनही होतो नियंत्रित : अनेक स्मार्ट बल्ब्सचे नियोजन तुम्ही घरात असताना किंवा नसताना करू शकता. तुम्ही घरात नसतानादेखील तुम्ही नियंत्रित करू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने हे तेव्हाच प्रभावी ठरू शकेल, जेव्हा तुम्ही दीर्घ सुट्यांसाठी शहराबाहेर असा. प्रकाश असेल तर घरात कुणीच नाही असे वाटणार नाही. एक फायदा असाही आहे तो म्हणजे कार्यालयातून घरी आल्यावर उजेड दिसेल. लाइट सुरू ठेवल्यामुळे विजेचा अपव्यय टाळता येऊ शकेल. बहुतांश ब्रँड एक हब ऑफर करतात त्यात अनेक लाइट्स एकाच वेळी एका अॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात.


रंग बदलू शकतो : अनेक स्मार्ट बल्बमध्ये रंग बदलण्याचे तंत्र असते. काहींमध्ये तर १९ दशलक्ष रंग निर्माण करण्याची क्षमता आहे. अॅपवरील चक्र फिरवून रंग निवडू शकतो. सिरी किंवा अलेक्साच्या साहाय्याने रंग बदलू शकतो.


संगीतही ऐकाल : स्मार्ट बल्बचे बिल्ट-इन स्पीकर्स या समस्येतून सुटका करतील. विश्वास ठेवा, बल्बमधूनच पार्टी केली जाऊ शकते. हे संगीत ऐकवतील, त्यानुसार रंगही बदलतील. काही बल्बमध्ये तर उत्कृष्ट दर्जाचे स्पीकर्सही येत आहेत.

X
COMMENT