आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्वसन क्रियेवर लक्ष ठेवणारा स्मार्ट शर्ट, न्यूमोनिया-अस्थमासारखे आजार तत्काळ ओळखणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सॅमसंग असा स्मार्ट शर्ट घेऊन येत आहे जो, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारख्या आजारांना ओळखेल. या शर्टमध्ये सेन्सर असतील जे फुप्फुसाचे रीडिंग घेतील. मुले आणि मोठ्यांसाठी स्वतंत्र शर्ट असतील. सॅमसंगने या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज केलेला आहे. सॅमसंगने मागील वर्षी स्मार्ट स्केटिंग सूट आणि मागील महिन्यात स्मार्ट शूजदेखील लाँच केले होते.
 
क्लिन्सबोट :९९.९% जंतू नष्ट करतो 
हॉस्टन विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालानुसार हॉटेलच्या खोलीमध्ये ८१% जागेवर हानिकारक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी क्लिन्सबोट नावाचा रोबोट कामाची वस्तू ठरू शकतो. यूव्ही लाइटमुळे ९९.९% जंतू नष्ट होतात, असा दावा करण्यात आला आहे. याचे वजन केवळ २२० ग्रॅम आहे. याला बॅगमध्ये ठेवता येते. पलंगाव्यतिरिक्त स्विच, रिमोट, मोबाइल फोन, कीबोर्डसारख्या वस्तूही हा स्वच्छ करतो.

 

पुढील स्लाइडवर पाहा Photos...

 

बातम्या आणखी आहेत...