आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smart Stethoscope Can Send Heartbeats By Email, Even If There Is A Hole In The Heart

स्मार्ट स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके ईमेलच्या मदतीने पाठवू शकणार, हृदयात छिद्र असल्यास त्याचीदेखील माहिती मिळेल  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कुमार निरंजन

मुंबई - आयआयटी मुंबईच्या प्रयोग शाळेत अॅडव्हान्स स्टेथोस्कोप तयार केले आहे. हे ब्लूटूथ आणि इंटरनेटच्या मदतीने चालेल. याद्वारे हृदयाच्या ठोक्यांचे रीडिंग ईमेल किंवा व्हॉटसअपच्या मदतीने डॉक्टरपर्यंत पोहोचवले जाऊ शकेल. एवढेच नाहीतर दूरवरच्या गावातून एखादी नर्स किंवा डॉक्टर रुग्णाच्या हृदयाचे ठोके तज्ञांना पाठवून त्यांचा सल्ला घेऊ शकेल. 


हा स्टेथोस्कोप गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोगांचे स्क्रीनिंग आणि मुलांच्या हृदयात छिद्र असल्यास ते कळण्यासाठी मदत करेल. हे सामान्य स्टेथोस्कोपपेक्षा सुमारे 35 टक्के जास्त उत्तम पद्धतीने हृदयाचे ठोके ऐकवते. याला 'आयु सिंक' नाव दिले आहे. याचे नवे व्हर्जन बनवणाऱ्या टीमचे सदस्य तपस पांडेने सांगितले की, 'आयु सिंक'च्या मदतीने ठोके 'आयु शेयर' अॅपद्वारे रेकॉर्ड केले जाते. रुग्णाचे स्क्रीनिंग करून गाइड करू शकतात


अॅडव्हान्स स्टेथोस्कोपने इतर शहरात बसलेले डॉक्टर ठोक्यांचा आवाज ऐकून रुग्णाचे स्क्रीनिंग करून गावात बसलेल्या स्टाफला गाइड करू शकतील. अॅपने ध्वनीचा फोनो कार्डियो-ग्राफदेखील बनवले जात आहे. जे ठोक्यांची गती कळण्यास मदत करते. डिव्हाईसची किंमत 14 हजार रुपये
 
तपसने सांगितले की, या डिव्हाईसने ईएमआयईएमसीची टेस्ट यशस्वीरित्या पास केली आहे. स्मार्ट 'आयु' सिंकमध्ये बॅटरी लावावी लागते, जी एकावेळी 18 तास काम करते. याची किंमत 14 हजार रुपये आहे. अॅडव्हान्स टेक्निकचे 100 स्टेथोस्कोप महाराष्ट्र आरोग्य विभाग तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी खरेदी करणार आहे. याची ऑर्डर 18 ऑक्टोबरला दिली जाईल. दोन-तीन महिन्यांमध्ये ते महाराष्ट्र सरकारकडे सोपवले जातील. 

बातम्या आणखी आहेत...