आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाची स्पंदने ई-मेल वा व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता, हृदयाच्या छेदाबाबतही मिळेल माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमितकुमार निरंजन | मुंबई

आयआयटी मुंबईच्या लॅबमध्ये अॅडव्हान्स स्टेथोस्कोप तयार करण्यात आला आहे. ब्ल्यू टूथ व इंटरनेट तंत्रज्ञानाने तो सुसज्ज आहे. हृदयाची स्पंदने ई-मेल अथवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठवता येतील. याच्या साह्याने ग्रामीण व दुर्गम भागातील परिचारिका अथवा डॉक्टर रुग्णांची स्पंदने तज्ज्ञांना पाठवून त्यांचा सल्ला घेऊ शकतात. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजाराचे स्क्रीनिंग व मुलांच्या हृद्यात असलेले छिद्र जाणून घेण्यासाठी या अॅडव्हान्स स्टेथोस्कोपची मदत घेता येईल. सर्वसामान्य स्टेथोस्कोपेक्षा ३५ पट चांगले काम करतो. याला ‘अायु सिंक’ असे नाव देण्यात आले आहे. 

याचे नवे व्हर्जन तयार करणाऱ्या पथकाचे सदस्य तपस पांडे यांनी सांगितले, आयु सिंकच्या मदतीने स्पंदने आयु अॅपद्वारे रेकॉर्ड करता येतात.  त्यानंतर ही स्पंदने अन्य डाॅक्टरांकडे व्हॉट्सअॅप अथवा ई-मेलवर पाठवू शकतात.    इतकेच नव्हे तर  अन्य शहरात बसलेल्या डॉक्टरांनी ही स्पंदने ऐकून रुग्णांचे स्क्रीनिंग करून गावातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात. अॅपने ध्वनीचा फोनो कार्डिओग्राफ करता येतो. 

उपकरण १८ तास काम करते, किंमत १४ हजार रुपये
तपस यांनी सांगितले, या उपकरणाची ईएमआयईएमसीकडून यशस्वीरित्या चाचणी पास करवून घेतली आहे. स्मार्ट ‘आयु’ सिंकमध्ये बॅटरी बसवावी लागते. ती सलग १८ तास काम करते. याची किंमत १४ हजार रुपये आहे. अॅडव्हान्स तंत्राच्या १०० स्टेथोस्कोपची महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने तीन जिल्ह्यासाठी आॅर्डर १८ ऑक्टोबरला दिली आहे.