आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खराब परफॉर्मन्समुळे नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर जुन्या फोनचा असा करा वापर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट- काही काळ वापरल्यानंतर स्मार्टफाेन्सचा परफॉर्मन्स खराब हाेऊ लागताे किंवा त्यातील फीचर्स जुने झाल्याने आपल्या कामी येत नसतात. त्यामुळे आपण जुने स्मार्टफोन्स वापरणे बंद करताे किंवा ते विकण्याचा प्रयत्न करत असताे. कारण बहुतांश युजर्सना जुन्या स्मार्टफोनचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करावा? हे माहीत नसते; परंतु तुम्ही जुन्या फाेनसारखी अशीच काही उपकरणे नव्याने वापर करू इच्छित असाल तर त्यासाठी किती तरी पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही असे... 

 

कारमध्ये नेव्हिगेशन जीपीएस 
तुम्हाला कार चालवता येत असेल तर तुमचा जुना फोन त्यात 'नेव्हिगेशन जीपीएस'चे काम करू शकताे. त्यासाठी सर्वप्रथम कारमध्ये ताे फाेन चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्ट व फोन माउंट गरजेचे आहे. यानंतर गुगल मॅप्सवर मॅपचे ऑफलाइन व्हर्जन डाऊनलोड करून जुना फाेन जीपीएससाठी वापरा. 


पोर्टेबल हॉटस्पॉट 
तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये सिमकार्ड टाकून ताे दुसऱ्या फाेनच्या माध्यमातून वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे वापरू शकता. तसेच घरी असताना त्याला रूटरसारखे प्लग इन व बाहेर गेल्यावर प्लग आऊट करू शकता. 

 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी स्टँडअलोन डिव्हाइस 
स्काइपवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत असाल तर जुन्या स्मार्टफोनचा वापर नेटवर्कविना (स्टॅंडअलोन डिव्हाइस) करू शकता. त्यासाठी एका डेस्कवर ट्रायपॉड ठेवून त्यात फोनला सेट करा. त्यानंतर एका चांगल्या ब्लूटूथ स्पीकरशी कनेक्ट करून त्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापर करू शकता. 

 

डेडिकेटेड मीडिया प्लेयर 

जुना फोन एक डेडिकेटेड मीडिया प्लेयर बनवून तुम्ही सध्या वापरात असलेल्या फाेनमधील जागाच नव्हे, तर त्याची बॅटरीही वाचवू शकता. त्यासाठी जुन्या फाेनला गुगल प्ले म्युझिक, अॅमेझाॅन प्राइम व्हिडिओ व इतर स्ट्रीमिंग सर्व्हिसेससाेबत लोड करा. 

 

पर्सनल काॅम्प्युटरसाठी वायरलेस कंट्रोलर 
जुन्या पर्सनल काॅम्प्युटरला प्रोजेक्टरशी जोडल्यानंतर की-बोर्ड व माऊसचा वापर करू इच्छित नसाल तर जुन्या स्मार्टफोनमध्ये 'युनिफाइड रिमोट' नावाचे अॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर वाय-फाय व ब्लूटूथचा वापर करून ते अॅप तुमच्या फोनला लॅपटॉपसाेबत पेयर करू लागेल. अशा प्रकारे एका हँडी रिमोटद्वारे तुम्ही व्हाॅल्यूम अॅडजस्ट किंवा टचस्क्रीनला ट्रॅकपॅडसारखे वापरू शकता.