आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीची व्यावसायिक वाढ व पीई सरासरीवर घ्या गुंतवणुकीचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- दीर्घ काळात संपत्ती कमावण्याचा चांगला पर्याय म्हणून शेअर बाजाराकडे पाहिले जाते. मात्र, इक्विटीमध्ये पैसे कमावणे इतकेही सोपे नसते. त्यासाठी संयम आणि शिस्त महत्त्वाची आहे, बाजाराची आणि कंपन्यांची चांगली माहिती ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी विशिष्ट शेअरमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याचे मूल्यांकन करायला हवे. जर इक्विटीमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल किंवा कधी-कधी गुंतवणूक करत असाल तर खाली दिलेल्या पाच मुद्द्यांचा नक्कीच विचार करा.  

 

कंपनीची वाढ कोठे होत आहे : 
कंपनीचा इतिहास आणि भविष्य दोन्हींचा विचार करा. ज्या कंपनीच्या महसुलात आणि नफ्यात सलग वाढ होत आहे, त्याच शेअरला बाजारात पसंती मिळते. गुंतवणूकदारांनी मागील काही वर्षांतील कंपनीच्या महसुलावर लक्ष ठेवायला हवे. कंपनीच्या व्यवसायातील वाढ कोठे होत आहे, हे पाहणे आवश्यक आहे. जर कंपनीचा कोअर व्यवसाय सलग वाढत असून महसुलातही वाढ होत असेल तर ही वाढ जास्त टिकाऊ असेल. दुसरी बाजू भविष्याची आहे. उदाहरणासाठी २००७ पर्यंत नोकिया अत्यंत चांगली कंपनी होती. मात्र, ३ वर्षांतच अॅपल आणि सॅमसंगने नोकियाच्या मोबाइल बाजारावर ताबा मिळवला होता. सांगायचा अर्थ, ज्या कंपन्यांमध्ये स्पर्धेतील कंपन्यांपेक्षा चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता असते, त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहतो.  

 

कंपनीवर जास्त कर्ज तर नाही ना : 
एक कुटुंब असो, कंपनी किंवा देश असो, जास्त कर्ज कधीच चांगली बाब नसते. कर्ज आणि इक्विटीचे गुणोत्तर उद्योगानुसार वेगवेगळे असते. मात्र, सामान्यपणे दुपटीपेक्षा कमीच गुणोत्तर चांगले मानले जाते. जास्त गुणोत्तराचा म्हणजेच कंपनीला कर्जावर जास्त व्याज भरावे लागेल. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. “इंटरेस्ट कव्हरेज रेशो’ ही कर्ज आकलनाची दुसरी पद्धत आहे. यावरून कंपनीचा अॅबेट (व्याज आणि कर भरण्याआधीच कंपनीचे उत्पन्न) व्याज देण्यासाठी किती पुरेसा आहे हे समजते. ज्या कंपनीवर कर्ज कमी असेल मात्र इंटरेस्ट कव्हरेज रेशो चांगला असेल, अशा कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवायला हवे. 
 
शेअरधारकांसाठी कंपनी काय करते : 
इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केवळ लाभांशातून नाही तर शेअरच्या किमती वाढल्याने ही फायदा मिळतो. कंपनीने संपत्तीचा वापर चांगल्या पद्धतीने केला तरी शेअरची किंमत वाढते. त्यासाठी ३ मुद्दे आहेत. पहिला, कंपनीचे मार्जिन (ऑपरेटिंग प्रॉफिट/विक्री) किती आहे. यावरूनच प्रॉफिटेबिलिटी निश्चित होते. मार्जिन स्थिर असायला हवे किंवा दीर्घ काळात यामध्ये वाढ झालेली असावी. दुसरे, अॅसेट टर्नओव्हर रेशो (विक्री/अॅसेट). यावरून विक्री वाढण्यासाठी अॅसेटचा कशा पद्धतीने वापर होत आहे हे लक्षात येते. हे गुणोत्तर जितके जास्त असेल कंपनीची क्षमतादेखील तितकी जास्त असेल. तिसरा, कंपनी शेअर धारकांसाठी किती कमाई करत आहे. यावरून रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल अॅप्लॉयडवरुन काढतात. यामध्येही स्थिरता आणि सलग वाढ असायला हवी.

 

व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसे आहे : 
अलीकडच्या महिन्यात खराब कॉर्पोरेट गव्हर्नन्स असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. क्वालिटी मॅनेजमेंट असलेल्या कंपन्या डिस्क्लोजर मानकांचा अवलंब करतात आणि शेअरधारकांप्रती पारदर्शी राहतात. अडचणीच्या काळातही या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण होत नाही. कंपनीचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन शेअरधारकांच्या हितासाठी काम करत असल्याचा शेअरधारकांमध्ये विश्वास असायला हवा. 

 

शेअरचे मूल्य योग्य पातळीवर आहे काय : 
सरळ शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअरचे बाजार मूल्य महत्त्वाचे असते. हे मूल्य कंपनीच्या वाढीशीही जोडलेले असते. एखादी कंपनी ६ टक्क्यांच्या दराने वाढत असेल तर १५ पीई गुणोत्तरावर त्याची खरेदी करणे योग्य होणार नाही. मात्र, एखाद्या कंपनीचा व्यवसाय दरवर्षी २५ टक्के वाढत असेल तर १९ पीईवरही कंपनीच्या शेअरचे मूल्य आकर्षक असू शकते. गुंतवणूकदारांनी प्राइझ-गुड व्हॅल्यू आणि लाभांश यील्डवर लक्ष द्यायला हवे. जर शेअरची किंमत कमी असल्याचे तुम्हाला वाटत असेल तरीही किती कमी आहे, हे पाहायला हवे. मूल्य अत्यंत कमी असल्यावरच गुंतवणुकीवर जास्त मार्जिन मिळू शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...