आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन विक्रीत 5% घट; 4 वर्षांत 9% महाग होणार; आयडीसीचा अहवाल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्मार्टफोन कंपन्या सतत नवीन मॉडेल लाँच करत आहेत. असे असतानाही याच्या विक्रीत जवळपास ५ टक्के घट आली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) अहवालानुसार, जगभरात स्मार्टफोनचा पुरवठा ४.९% कमी झाला आहे. पुरवठ्याची संख्या घटल्याची ही सलग पाचवी तिमाही आहे. या हिशेबाने २०१८ स्मार्टफोन विक्रीसाठी सर्वांत वाईट वर्ष ठरले. या वर्षी जगभरात एकूण १.४ अब्ज स्मार्टफोनचा पुरवठा झाला. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत हा ट्रेंड सुरू राहील, असा अंदाज आहे. आयडीसीच्या अहवालानुसार चार वर्षांत स्मार्टफोनचे सरासरी विक्री मूल्य (एएसपी) ९% वाढेल. 

 

५ फीचर्स गायब होतील : 
लवकरच सर्व फोन्समध्ये ई-सिम येईल. यापुढे फेस अनलॉकला महत्त्व येईल. यानंतर डिस्प्लेच स्पीकरचे काम करेल, अशी स्थिती येईल. हेडफोन जॅक गायब करण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. व्हॉल्यूम बटणाचे काम फंक्शनल पॉवर/ वेक बटण करू शकेल. 
 

बातम्या आणखी आहेत...