भारतात स्मार्टफाेनच्या विक्रीत ४ % वाढ, ३.१ काेटी उपकरणांची विक्री; शाओमी पहिल्या स्थानावर

दिव्य मराठी

Apr 27,2019 08:27:00 AM IST

नवी दिल्ली - भारतात या वर्षी पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत स्मार्टफोनची विक्री ४ टक्क्यांनी वाढली आहे. या तीन महिन्यांत एकूण ३.१ कोटी स्मार्टफोन विकले गेले, अशी माहिती काउंटर पाॅइंट रिसर्चच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. या अहवालानुसार भारतात डेटाचा वापर वाढला आहे आणि इतर देशांच्या तुलनेत येथील लोक लवकर हँडसेट बदलत आहेत. यामुळे ही वाढ पाहण्यास मिळाली आहे. सॅमसंगच्या नेतृत्वाखाली प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आक्रमक रणनीती आखल्याने चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीचा भारतातील हिस्सा घटला आहे.

दर १७ महिन्यांनी स्मार्टफोन बदलतात

> वर्षाच्या सुरुवातीला अालेल्या अहवालानुसार भारतीय हर १७ महिन्यांनी अापला स्मार्टफोन बदलतात। मेट्रो शहरात राहणारे दर १६ महिन्यांनी नवीन उपकरण खरेदी करतात . तेच बगर शहरी भागातील ग्राहक दर 18 महिन्यांनी नवीन स्मार्टफोनची खरेदी करतात.

> स्मार्टफोन रिप्लेसमेंटची जागितकस्तरावरील कालावधी २१ महिने अाहे. चीनमध्ये लाेक दर २२ महिन्यांनी आपला फाेन बदलतात. जपानमध्ये दर २१ महिन्यांनी आणि अमेरिकेत दर ३२ महिन्यांनी स्मार्टफोन बदलतात. युराेपियन संघात हा वेळ 28 महिने आहे

मोबाइल युजर महिन्याभरात 8.3 जीबी डेटा वापरतात

> भारतात स्मार्टफोन ची विक्री वाढण्यामागे माेबाइल इंटरनेटचा वाढता वापर प्रमुख कारण ठरत अाहेे. मॅकिंन्सीच्या अहवालानुसार भारतात स्मार्टफाेन वापरकर्ता दर महिन्याला सरासरी ८.३ जीबी डेटा वापरताे. भारतात साेशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळेही याला बळकटी मिळालेली अाहे. भारतातील ग्राहक प्रत्येक आठवड्याला १७ तास साेशल मिडियावर खर्च करतात. हे प्रमाण चीन, अमेरिकेपेक्षा जास्त आहे.

> चीनमध्ये प्रत्येक ग्राहक सरासरी ५.५ जीबी माेबाईल डेटा वापरताे. काेरियात हे प्रमाण ८.५ जीबी आहे. .

चायनीज कंपन्यांचा बाजार हिस्सा ६६% झाला विक्रीत एक वर्षात २० टक्के वाढ

भारतात चायनीज कंपन्यांचे एकूण शेअर मार्केट ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. व्हीवाे, रिअलमी मी आणि आेप्पोच्या वाढीमुळे भारतात चायनीज ब्रँडची विक्री गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. श्याओमीच्या रेडमी नोट ७ सीरीजने लॉचिंगनंतर पहिल्या तिमाहीत १० लाख हँडसेटची विक्री केली आहे.

सॅमसंगने वन प्लसला टाकले मागे

प्रीमियम सेगमेंटमध्ये (३० हजार रुपयांपेक्षा जास्त) सॅमसंगने वन प्लसला मागे टाकत भारतीय बाजारात पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. गॅलेक्सी एस १० सिरीजच्या यशानंतर सॅमसंगला मोठे यश मिळाले आहेे.

X