आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मम म्हणजे माझे व माझेपणाची भावना हेच ममत्व. ममता ही अनुभवण्याची भावना असते. प्रत्येक कृतीला पूर्णत्व आणण्यासाठी महत्त्वाची असते ती ममता. जिव्हाळा हे ममतेचे दुसरं नाव. ममता, माझेपणाची भावना जिथं असते तिथेच प्रेम, जिव्हाळा, माया, दया, हे आपोआप निर्माण होतात. ही ममता पशू-पक्षी या सर्वांच्याच ठिकाणी असते. मांजर आपल्या पिल्लांना दात न लागू देता एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी नेते. पण पिल्लांना तिचे दात लागत नाहीत. पशू-पक्षीही आपल्या पिल्लांना दाणा-पाणी भरवतात. पण ते त्या भावनेत अडकून पडत नाहीत. कृतज्ञतेची अपेक्षा करत नाहीत. म्हणूनच दरवेळी नवे घरटे बांधतात. पिल्लं मोठी झाली की उडून जातात.  माणसांचे तसे नाही. मी, माझे ही भावना इतकी मोठी असते की तिचे आसक्तीत रूपांतर केव्हा होते हे कळत नाही. त्याच आसक्तीचे रूपांतर दु:खात होते. गर्वात होते. मालकीची भावना ज्यात लपलेली असते ती शुद्ध ममता कशी म्हणता येईल? योग्य वेळी ममतेला विवेकानं आवरले पाहिजे. मोहापासून ममता अलिप्त ठेवली पाहिजे. ममता फक्त जीवमात्राच्याच अनुषंगानं असते असं नाही. लेखक पुस्तक लिहिताना त्यात जीव ओततो. वाचकांसाठी ती परिपूर्ण ठरेल यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक कलाकार कलाकृतीत ममतेनं गुंतलेला असतो. शेतकरी काळी आई म्हणत शेतातली माती कपाळी लावतो ती ममताच. देशभक्ताला मातृभूमीविषयी वाटणाऱ्या ममतेमुळेच तो त्याग आणि समर्पणासाठी कायम तयार असतो. निर्मम होऊन विश्व कल्याणाची कामना करतात ते संत. आपण सामान्य माणसं मोह, माया, लोभ, क्रोध यापासून दूर राहू शकत नाही. आपले विश्वच ‘मी’भोवती गुरफटलेले असते. ममता करताना सुबुद्धी ठेवली तर ‘सुख, दु:ख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ या भावनेनं मनाचा समतोल ठेवता येतो. प्रत्येक कृती परमेश्वराला अर्पण केली तर सर्वांबद्दल ममत्वाची भावना निर्माण होईल. बाबा आमटे म्हणतात, दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी न होता आपण त्याच्या जागी असतो तर ही कल्पना म्हणजे ममता...

बातम्या आणखी आहेत...