अभिनेत्री स्मिता तांबे / अभिनेत्री स्मिता तांबे चढली बोहल्यावर, या कलाकारासह अडकली विवाहबंधनात 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 20,2019 10:26:00 AM IST

एन्टटेन्मेंट डेस्क. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरु आहे. गेल्या वर्षात अनेक आघाडीचे कलाकार विवाहबंधनात अडकले आणि त्यांनी त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. आता बॉलिवूड मागोमाग मराठी सिनेसृष्टीत सनई चौघडे वाजायला सुरुवात झाली आहे. एक मराठमोळी अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. आपल्या अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावार आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता तांबे रेशिमगाठीत अडकली आहे. नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसह स्मिताचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यांनी दोन पध्दतींनी लग्न केले. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित होती. रेशमने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर मैत्रिणीच्या लग्नाचे खास फोटोज शेअर केले आहेत.

रेशमने शेअर केले फोटो
आपल्या मैत्रिणीच्या लग्नाचे खास फोटोज रेशमने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. मैत्रिणीला नववधूच्या रुपात पाहून रेशमचा आनंद गगणात मावत नव्हता. ती खुप आनंदी दिसत होती. तिने मैत्रिणीला विशेष शुभेच्छा दिल्या. 'दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे' अशी प्रतिक्रिया रेशम टिपणीसने दिली.

दमदार अभिनय करणारी स्मिता
स्मिता तांबेने 'अनुबंध' मालिका, 'तुकाराम', 'जोगवा', '७२ मैल', 'गणवेश', 'परतु'सारखे सिनेमे किंवा 'हमिदाबाईची कोठी'सारखं अजरामर नाटक या आणि अनेक कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयानं स्वतःचा ठसा उमटवला आहे.


Congratulations Mr & Mrs Dwivedi.

A post shared by Resham Tipnis (@tuffnut10) on Jan 17, 2019 at 11:13pm PST

X
COMMENT