Home | International | Pakistan | Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

Shocking: येथे 2-3 वर्षांची मुलेही ओढतात सिगारेट, आई-वडिलांना नाही आक्षेप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 20, 2018, 12:13 AM IST

इंडोनेशियात 60 टक्के पुरुष नियमित धूम्रपान आणि तंबाखूचा वापर करतात. यात 2 ते 8 वर्षे वयाची लहान मुलीने ओढली गेली आहेत.

 • Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

  इंटरनॅशनल डेस्क - पश्चिमी देशांत धूम्रपान करणा-या लोकांची संख्या एकीकडे घटत आहे तर दुसरीकडे इंडोनेशियासारख्या देशात मोठी वाढ होत आहे. इंडोनेशियात 60 टक्के पुरुष नियमित धूम्रपान आणि तंबाखूचा वापर करतात. यात 2 ते 8 वर्षे वयाची लहान मुलीने ओढली गेली आहेत. यावर आधारित कॅनडाच्या एका फोटोग्राफरने एक डॉक्युमेंट्री बनविली आहे. मिशेलच्या म्हणण्यानुसार, धूम्रपान जणू काही इंडोनेशियाची संस्कृतीच बनली आहे.

  तंबाखू अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग...
  तंबाखूचा वापर जणू काही इंडोनेशियाची संस्कृती, राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे. येथे प्रत्येक 10 पावलावर तुम्हाला धूम्रपान करणारे लोक आणि तंबाखूची जाहिरात पाहायला मिळेल. येथील 10 पैकी 3 घरे बीडी-सिगरेट बनविण्याच्या व्यवसायात जोडली आहेत. इंडोनेशियाची अर्थव्यवस्था तंबाखू इंडस्ट्रीवर निर्भर आहे ज्यातून मोठा फायदा होतो. येथील एक मोठा वर्ग आपले जीवन तंबाखूची शेती करून चालवतो आणि आपले लहानपण सिगरेटच्या धुरात घालवतो. धूम्रपानाबाबत तेथे नियम जगापेक्षा फारच वेगळे आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळेत मुले सिगरेट ओढताना सहज दिसून येतात.


  2 ते 8 वर्षाची मुलेही ओढतात सिगारेट
  येथील सरकारला तंबाखू इंडस्ट्रीचे नियंत्रण सोपे नाही. कारण तसेच केल्यास कमाईचे मोठे साधन बंद होईल. मिशेलने सांगितले की, आता तेथे अशी स्थिती आहे की, हे धूम्रपान तेथील लोकांसाठी आणि संस्कृतीसाठी धोका ठरू लागले आहे. याचे बळी मुलेही पडत चालली आहेत व त्याचे बालपण व निरागसपणा हरवला आहे. ते प्रौढ लोकांसारखी सिगरेट पितात. यातील दोन ते 8 वर्षे वयाची मुलांचाही समावेश आहे. जे दिवसभरात सिगरेटची दोन दोन पाकिटे संपवितात. धक्कादायक बाब म्हणजे ही मुले आपल्या आई-वडिलांसमवेत हे सर्व करतात आणि त्यांचे पालक त्यांना रोखत नाहीत की त्यांना काहीही आक्षेप नसतो.

  इल्हम हदी
  पाच वर्षाचा इल्हम हदी वयाच्या तिस-या वर्षापासून सिगरेट पितो. त्याला रोज दोन सिगरेट पॅकिटे लागतात. मात्र, हदीची सिगरेटची सवय कमी कमी होत चालली आहे. त्याच्या घरच्याचे म्हणणे आहे की, तो लवकरच सिगरेट सोडेल.


  पुढील स्लाइड्सवर वाचा, सिगारेट ओढणाऱ्या या लहान मुलांचे मनोगत...

 • Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

  अलदी इलहाम
  अलदी इलहामचे वय सध्या 8 वर्षे आहे व तो रोज 20 सिगरेट पितो. अलदीने वयाच्या 5 वर्षापासून सिगरेट पिणे सुरु केले. मात्र, अलदीच्या घरच्यांचे म्हणणे आहे की, तो हळू हळू सिगरेट पिणे सोडून देईल.

 • Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

  चेरुल
  जावात राहणारा हा चेरुल वयाच्या दोन वर्षाचा आहे. स्मोकिंग करणारा इंडोनेशियातील तो सर्नात लहानगा ठरला आहे. चेरुल रोज 10-12 सिगरेट पितो. धक्कादायक म्हणजे या सिगरेट त्याला त्याचे आजोबाच पाजतात. त्याच्या आजोबाचे म्हणणे आहे की, यात वावगे काहीच नाही त्याला सिगरेट पिणे आवडते.

 • Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

  मौलाना
  पाच वर्षाचा मौलाना 3 वर्षाचा असताना पासून सिगरेट पितो. त्याच्या आईचे म्हणणे आहे की, त्याला सिगरेट पिण्यापासून मी रोखू शकत नाही. कारण त्याला रोखले तर चोरून पितो. तसेच ओरडले, मारले तर तो रडत बसतो, जेवण करत नाही त्यामुळे बारीक होतो.

 • Smoking Children Of Indonesia, Even 2 Year Old Is Addicted

  दिहान मुहम्मद
  दिहान मुहम्मदचे वय 5 वर्ष आहे. मात्र त्याला सिगरेटचे व्यसन आहे, तो दिवसभरात दोन पाकिटे संपवतो. इयत्ता पहिलीच शिकणा-या दिहानची दिवसाची सुरुवाता सिगरेटने होते.

Trending